एकनाथ शिंदेंचे उमेदवार संजय शिरसाट यांची ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना धमकी

म्हणाले- मस्ती आली का तूला अन् केली शिवीगाळ; पाहा- मतदान केंद्रावरील VIDEO

On
एकनाथ शिंदेंचे उमेदवार  संजय शिरसाट यांची ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना धमकी

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. उस्मानपुरा भागातमतदान केंद्राजवळ हा सर्व प्रकार घडल्याचे समजते.

RCC New

RCC New

अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत संजय शिरसाट समोरच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करताना दिसत आहेत. सोबतच दोन मिनिटांत गायब करून टाकेल, अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली.

 


शिरसाटांपासून माझ्या जीवाला धोका

ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख नितीन पवार म्हणाले की, उस्मानपुरा भागात मतदान केंद्राबाहेर बुथवर बसलेलो असताना आमदार संजय शिरसाट यांची गाडी तिथे आली. यानंतर त्यांनी घोषणाबाजी करत आम्हाला डिवचले. आम्ही आमच्या पक्षाचा झेंंडा फडकवला असता, आमदारांनी मला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत गायब करुन टाकेल असे म्हणाले. संजय शिरसाट यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असून उद्या जर मला काही झाले तर त्यासाठी आमदार संजय शिरसाट आणि त्यांचे कार्यकर्ते जबाबदार असतील.



मी कधीच सत्तेचा उन्माद केला नाही- शिरसाट

संजय शिरसाट म्हणाले की, संजय शिरसाट काय करतात याचा अंबादास दानवेंना फार जुना अनुभव आहे. मी कुणाच्या नादी लागत नाही अन् कुणी नादी लागले तर सोडत नाही. छोटा विषस तिथेच दाबला पाहिजे, नाहीतर तो मोठा होता आणि त्यांचा मतदारांना त्रास होतो. सध्या मतदारसंघात मी निवडून येईल अशी परिस्थिती आहे. म्हणून हे गडबड करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. कधी-कधी अशी लोकशाहीदेखील लोकांना आवडते. मी कधीच सत्तेचा उन्माद केला नाही. मतदारांना ते आडवत असल्याने मला तशी भूमिका घ्यावी लागली. तो मतदारसंघ संवेदनशील आहे, तिथे एका मतदाराला जरी थांबवले असते तर लोकं घरातून मतदानासाठी बाहेर पडले नसते.

भाजपच्या माजी नगरसेवकाकडून पैसे घेणारे मतदार देवळाई तांड्यावरून गायब

24 तासांपूर्वीच संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात 155 मतदार संख्या असलेल्या देवळाई तांडा येथे मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांच्या तीन गाड्या तांड्यावर गेल्या. त्यामुळे गावात दहशत पसरली होती. व्हिडिओमधील लोक तांड्यावरून निघून गेले होते.

देवळाई तांडा येथे महायुतीच्या उमेदवाराचे पैसे वाटतानाचा व्हिडिओ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समोर आणला. या व्हिडिओमध्ये भाजपचे देवळाईचे माजी नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे पैसे देताना दिसत आहेत. ‘दिव्य मराठी’ने देवळाई तांड्याला भेट दिली. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांची 3 वाहने गावात येऊन गेली होती. त्यामुळे याबाबत गावातील कुणीही बोलण्यास पुढे आले नाहीत.

हा तर विरोधकांचा कट

अंबादास दानवे काय म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. माझा विजय निश्चित असल्यामुळे कट रचण्याचे काम सुरू आहे. विरोधकांनी काहीही केले तरी मतदार जागरूक आहेत. संपूर्ण घटनेचा पोलिस तपास करतील. पैसे वाटप करण्याचा प्रकार मी केलेला नाही. - संजय शिरसाट, उमेदवार, शिंदेसेना

Tags:

Advertisement

Latest News

मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल  मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल 
मुंबई :  राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान प्रकिया पार पडली. त्यानुसार, राज्यभरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते,...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सर्व एक्झिट पोलमध्ये पुन्हा महायुतीला कौल, ठाकरे-शिंदेंचे काय? 
मतदानाची  वेळ संपली; राज्यभरात 5 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान
अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
सोलापुरात मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाला दे धक्का; आघाडी धर्म तुटला! 
नांदगाव विधानसभा मतदारसंघात राडा, शिवसेनेच्या आमदारांनी दिली समीर भुजबळांना धमकी 
संगीतकार AR रहमान आणि सायरा बानो यांचा घटस्फोट का झाला?