सोलापुरात मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाला दे धक्का; आघाडी धर्म तुटला!
सुशीलकुमार शिंदे अन् प्रणिती शिंदे यांनी दिला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
Solapur Assembly Election 2024 : सोलापूर दक्षिण मतदारसंघात (Solapur District Assembly Constituency) खासदार प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झटका दिला असून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. ऐन मतदानाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने सोलापूरात आघाडी धर्म न पाळल्याचे दिसून आले.
RCC New
ऐनवेळी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भूमिकेनं ठाकरेंना धक्का बसला आहे. प्रणिती शिंदे यांनी ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देत महाआघाडीचा धर्म पाळला असाही दावा केला.
सोलापूर दक्षिण विधानसभामतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. मात्र खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली होती.
आघाडी धर्म आम्ही पाळला
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, या मतदारसंघाने मुख्यमंत्री निवडून दिला आहे. आघाडी धर्म आम्ही पाळला असून आम्ही एबी फॉर्म दिलेला नाही. या जागेवरून काही गैरसमज झाले होते, चुकून गेलं असेल असं वाटलं, पण आम्ही काडादी यांच्या मागे आहोत, जो जिता वही सिकंदर होणार असून आम्ही पक्षाकडून एबी फॉर्म न दिल्याने येथे आघाडी धर्म पाळला आहे.