धनगर आरक्षणात खोडा घालणाऱ्या लोकप्रतिनींधीना धडा शिकवा – मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे 

 पुढील येणाऱ्या दिवसात कोणत्याही आमिषाला बळी पडू नका ; कोणतेही खोटे आश्वासनाचे शिकार होऊ नका 

On
धनगर आरक्षणात खोडा घालणाऱ्या लोकप्रतिनींधीना धडा शिकवा – मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे 

जालना / प्रतिनिधी :  धनगर आरक्षणात खोडा घालणाऱ्या आणि धनगर समाजाची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनींधीना धनगर समाज बांधवांनो धडा शिकवा, असे आवाहन मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे यांनी केले आहे.

आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडण्याची मोहीम 

धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात सकल धनगर समाज एकसंघ झाला होता. लोकसभेत त्याचा रोष मतातून स्पष्टपणे उमटला. आता विधानसभेतही त्याच धर्तीवर मतदान करण्याचा निर्धार होत आहे. धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने मोहिम राबवली जाण्याची तयारी सुरु आहे. धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडासाप करण्याचा मेसेज सोशलमिडियावर जोरदार व्हायरल करण्यात येत आहेत. त्याला लाईक देखील मिळत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत धनगर फॅक्टरचा परिणाम दिसून येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

हजारे यांच्या आंदोलनाने समाज एकसंघ झाला

धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे यांनी पहिल्या वेळी १६ दिवस आणि दुसऱ्या वेळी २० दिवस आमरण उपोषण केले होते तेंव्हापासून सकल धनगर समाज एकसंघ झालेला आहे. मात्र, सरकारच्या वतीने वेळोवेळी फसवणूक झाली आहे. यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या सरकारचा समावेश होता. धनगर समाजाच्या आंदोलनादरम्यान लोकप्रतिनिधीनी आंदोलनाकडे पाठ फिरवली होती तर कांही जणांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे धनगर आरक्षणात खोडा घालणाऱ्या लोकप्रतिनिधीवर सकल धनगर समाजाचा प्रचंड रोष आहे. त्यानंतर आता मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे यांनी धनगर आरक्षणात खोडा घालणाऱ्या लोकप्रतिनींधीना धडा शिकवण्याचे आवाहन धनगर समाजाला केले आहे.

कोण आहेत मल्हारयोद्धा हजारे?

चंद्रकांत हजारे यांचा मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे पर्यंतचा प्रवास संघर्षपूर्ण आहे. महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थी चळवळीत सक्रिय असलेले चंद्रकांत हजारे यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतरही सामाजिक कार्यात पुढाकार घेतला. या तरुणांने आपल्या परिसरातील समस्या सोबत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी पुढाकार घेतला. गेली अनेक वर्षांपासून प्रत्येक सरकारने धनगर समाजाला एस टी चे आरक्षण अंमलबजावणी करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही ही बाब त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे चंद्रकांत हजारे यांनी लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन, रस्ता रोको, आमरण उपोषण या शस्त्राचा वेळोवेळी अवलंब केला.

लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आमरण उपोषन केले तसेच छत्रपती संभाजीनगर येथील जातपडताळणी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. यानंतर मंत्रालयात आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीतील सर्वात मोठा अडसर म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबियांचे बोगस धनगड जातींचे वैधता प्रमाणपत्र ठरत होते. सकल धनगर समाजाच्या संघर्षातून अखेर हे धनगड जातींचे बोगस वैधता प्रमाणपत्र प्रशासनाने रद्द ठरवले आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..! मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..!
Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महाराष्ट्रात उद्या अर्थात बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाची यासाठी...
उद्या 288 जागांसाठी मतदान; किती उमेदवार, मतदार किती, वाचा एका क्लिकवर सविस्तर
भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी