आसाराम बापू तुरुंगाबाहेर; 11 वर्षात दुसऱ्यांदा पॅरोल, 30 दिवस राहणार रुग्णालयात 

नारायण साईने वडिलांना भेटण्याची केली होती विनंती; उपचारासाठी कोर्टाने दिले आदेश 

On
आसाराम बापू तुरुंगाबाहेर; 11 वर्षात दुसऱ्यांदा पॅरोल, 30 दिवस राहणार रुग्णालयात 

Asaram Bapu parole for 30 days : बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू 30 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर आला आहे. 7 नोव्हेंबर रोजी जोधपूर उच्च न्यायालयाने आसारामला उपचारासाठी पॅरोल दिला होता. अकरा वर्षात ही दुसऱ्यांदा मिळालेली पॅरोल आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, जोधपूरमधील भगत की कोठी येथील खासगी आयुर्वेदिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. रविवारी रात्री त्याला रुग्णवाहिकेतून आणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आसारामला पाहण्यासाठी त्याच्या समर्थकांची मोठी गर्दी केली होती. 

उपचारासाठी परवानगीची केली होती मागणी 

हाय कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठाने आसारामच्या उपचारासाठी परवानगी देण्याच्या अर्जावर आदेश दिले होते. त्याला 11 वर्षांत दुसऱ्यांदा उपचारासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी त्याला ऑगस्टमध्ये 7 दिवसांचा पॅरोल मिळाला होता. 

अनिश्चित काळासाठी रजा मागितली होती 

आसारामच्या वतीने ज्येष्ठ वकील आर.एस. सलुजा आणि यशपाल राजपुरोहित यांनी उपचारासाठी परवानगीसाठी अर्ज सादर केला होता. आसारामच्या वकिलांनी डॉक्टरांनी रुग्णालयातून डिस्चार्ज होईपर्यंत अनिश्चित काळासाठी उपचार करण्याची परवानगी मागितली होती. सरकारचे वकील अतिरिक्त महाधिवक्ता दीपक चौधरी यांनी 30 दिवसांच्या परवानगीसाठी युक्तिवाद केला. 

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने आसारामला उपचारासाठी 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला. यापूर्वी 13 ऑगस्ट रोजी हायकोर्टाने 7 दिवसांचा पॅरोल दिला होता. उपचारासाठी आसारामला 11 वर्षांत प्रथमच पॅरोलवर आला होता. त्यानंतर आसारामने महाराष्ट्रातील माधोबाग आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर आसारामला पुन्हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले.

नारायण साईने वडिलांना भेटण्याची केली विनंती

18 ऑक्टोबर रोजी आसारामचा मुलगा नारायण साई यानेही वडिलांना भेटण्याची विनंती केली होती. सुरतच्या लाजपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या साईला गुजरात उच्च न्यायालयाने मानवता लक्षात घेऊन परवानगी दिली होती. यासाठी नारायण साईला 5 लाख रुपये देण्यास सांगितले होते. वडील आसारामला भेटण्यासाठी त्याला 4 तासांची मुदत देण्यात आली होती. 

Tags:

Advertisement

Latest News

मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..! मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..!
Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महाराष्ट्रात उद्या अर्थात बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाची यासाठी...
उद्या 288 जागांसाठी मतदान; किती उमेदवार, मतदार किती, वाचा एका क्लिकवर सविस्तर
भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी