नांदेडमध्ये  अशोक चव्हाण यांना धक्का; भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपला दिली सोडचिठ्ठी; सून मीनल यांना नायगावमधून हवे तिकीट, नांदेडमध्ये पुन्हा सुगीचे दिवस येणार

On
नांदेडमध्ये  अशोक चव्हाण यांना धक्का; भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Former MP Bhaskarrao Patil Khatgaonkar joins Congress : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी शुक्रवारी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व मीनल पाटील खतगावकर यांनीही काँग्रेसमध्ये घरवापसी केली. यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.

भास्करराव पाटील खतगावकर हे अशोक चव्हाण यांचे मेहुणे आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण लोकसभा निवडणुकीत भाजपची हाराकिरी झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा काँग्रेसचा 'पंजा' हातात घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबई स्थित टिळक भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात भास्करराव पाटील यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांच्यासोबत त्यांच्या स्नुषा मीनल पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सूनेसाठी हवी नायगावची उमेदवारी

सूत्रांच्या माहितीनुसार, भास्करराव पाटील खतगावकर यांना त्यांच्या स्नुषा मीनल यांच्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे. काँग्रेसने ही उमेदवारी देण्याची तयारी दर्शवल्यामुळे त्यांनी अशोक चव्हाण यांना धक्का देत काँग्रेसमध्ये येणे पसंत केले. भास्करराव पाटील हे 3 वेळा खासदार व 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांचा नांदेड काँग्रेसवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या त्यांच्या पक्षप्रवेशाचा काँग्रेसला मोठा लाभ होईल असा दावा केला जात आहे.

अनेक नेत्यांनी सोडली भाजपची साथ उल्लेखनीय बाब म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपची साथ सोडली आहे. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आता भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या सूनबाई तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मीनल पाटील खतगावकर व माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे नांदेड येथील आणखी काही नेते निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ माजली आहे.

मीनल यांनी घेतली होती शहांची भेट

लोकसभा निवडणुकीपूर्वी मीनल पाटील खतगावकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे नांदेड लोकसभेची उमेदवारी मागितली होती. पण भाजपने त्यांच्याऐवजी आपले विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच पसंती दिली होती. यामुळे खतगावकर यांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे त्यांनी आता भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात हातात घेतला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांचा काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांनी पराभव केला होता. पण चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वीच प्रदिर्घ आजाराने निधन झाले. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार