हरियाणात निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या; 30 हून अधिक जागांवर तिरंगी लढत 

90 जागांसाठी मतदान, 8 ऑक्टोबरला लागणार निकाल

On
हरियाणात निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या; 30 हून अधिक जागांवर तिरंगी लढत 

Haryana Assembly Election 2024 :  हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस,. आज 3 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

या ठिकाणी भाजपला विजयाची हॅट्ट्रिक साधता येईल का, की काँग्रेस दहा वर्षांत प्रथमच पुनरागमन करेल, हे निकालानंतरच कळणार आहे. हरियाणात यंदा 30 हून अधिक जागांवर तिरंगी लढत होत आहे. शिवाय राज्यातील 22 टक्के दलित मतदारही यावेळी निर्णायक भूमिका बजावणार आहेत.

देशातील दिग्गजांनी घेतल्या सभा

हरियाणा विधानसभेसाठी ९० जागांवर मतदान होत आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपसह काँग्रेस, आम आदमी पार्टी, जननय जनता पार्टी आणि इंडियन नॅशनल लोक दल यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक स्टार प्रचारकांनी निवडणूक रॅली काढल्या. तसेच हजारोंच्या संख्येने प्रचारसभाही घेतल्या. 

'या' जागांवर तिरंगी लढत हरियाणा निवडणुकीत तब्बल 30 जागांवर तिरंगी लढती होत आहेत. यामध्ये हिस्सार, गुडगाव, गन्नौर, गोहाना, कलायत, पुंद्री, रेवाडी, मेहम, बडोदा, अंबाला कँट, पानिपत ग्रामीण आणि पानिपत शहरी इत्यादीं महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. या सर्व लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

भाजपसाठी 'ही' आहेत आव्हान

हरियाणा विधानसभा निवडणूक जिंकून सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात असलेला भाजप ग्रामीण भागातील मते फोडण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्यावेळी भाजपने अहिरवाल आणि जीटी बेल्टमध्ये चांगली कामगिरी केली होती. यावेळीही तशाच कामगिरीची भाजपला आशा आहे. राहुल गांधींनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जीटी बेल्ट आणि अहिरवालमध्ये सभा घेतल्या. गेल्या निवडणुकीत भाजपने तेथे 37 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या.

काँग्रेससाठी 'ही' आहेत आव्हान

2014 आणि 2019 मध्ये हरियाणा निवडणुकीत पराभव पत्करलेल्या काँग्रेसने 2024 या वर्षासाठी विशेष रणनीती आखली आहे. यावेळी काँग्रेसचे लक्ष जाट आणि दलित मतांवर आहे. जाट पट्टा टिकवण्यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागणार आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जाट पट्टा गोहाना आणि बगडमधील हिस्सारमध्ये निवडणूक रॅली घेऊन पंतप्रधान मोदींनी मतांतर करण्याचा जोरदार प्रयत्न केलेला दिसला. उद्या किती टक्के मतदान होते व ते कुणाच्या पथ्यावर पडते, हे निकालानंतर समजणार आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार