अंमलबजावणी तात्काळ करा, नाहीतर धनगरांशी गाठ ! उपोषणकर्ते हजारे, गोयकर यांचा सरकारला इशारा 

लातूरमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणा, 13 वा दिवसाही सरकारला नाही जाग

On
अंमलबजावणी तात्काळ करा, नाहीतर धनगरांशी गाठ ! उपोषणकर्ते हजारे, गोयकर यांचा सरकारला इशारा 

Dhangar Reservation Fast, Day 13  लातूर : शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात मागील १३ दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी प्रवर्गाच्या आरक्षणापासून धनगर समाज वंचित असून सरकार एसटी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सकारात्मक असल्याचे वेळोवेळी सांगून वेळकाढू पणा करत आहे, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा नाहीतर सरकारची धनगरांशी गाठ आहे', असा इशाराच उपोषणकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी सरकारला दिला. १३ दिवस होऊन देखील या आंदोलनाबाबत कोणताही तोडगा निघालेला नसल्याने धनगर आंदोलन आक्रमक झाले आहे.

धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा तेरावा दिवस आहे. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनस्थळी धनगर समाजाचा उपोषणकर्त्यांच्या भेटी वाढल्या आहेत. यावेळी मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी सरकारने तातडीने याबाबत तोडगा काढावा, अन्यथा सकल धनगर समाज तुम्हाला कदापिही माफ करणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे मागील ७०वर्षात धनगर समाजाची पिछेहाट झाली असून समाजात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असून धनगर समाज मुख्य प्रवाहात आला नसल्याची खंत उपोषणकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी व्यक्त केली.

सोमवारी रास्ता रोको

धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आमरण उपोषण करीत असलेल्या दोघांची प्रकृती खालावत असून तरीही शासन या उपोषणाची दखल घेत नाही. हे पाहून सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार (दि.२३) रोजी सकाळी १० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

 

 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार