मोठी बातमी : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बीआरएस पक्ष होणार विलीन

महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते करणार शरद पवार गटात प्रवेश

On
मोठी बातमी : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बीआरएस पक्ष होणार विलीन

BRS activists will join Sharad Pawar group : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बीआरएस पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्याच्या निसर्ग मंगल कार्यालय येथे शरद पवारांच्या उपस्थितीत 6 ऑक्टोबर रोजी बीआरएसचे कार्यकर्ते पक्षात प्रवेश करणार आहेत. बीआरएस पक्षाची महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकरणी आणि पदाधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती बीआरएसचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक बाळासाहेब देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. 6 ऑक्टोबर रोजी प्रदेश बीआरएसची कार्यकारणी, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय डाव शरद पवार टाकणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आता याचा आगामी विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, तेलंगणातील बीआरएस पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी महाराष्ट्रात बीआरएस पक्ष वाढवण्यासाठी मोठी रॅली काढली होती. त्यावेळी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी नागपूर येथे पक्ष कार्यालय देखील सुरू केले होते, मात्र काही दिवसातच गाशा गुंडाळावा लागला होता. तेलंगणामध्ये देखील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाला फारसे यश आले नव्हते. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार