धक्कादायक : विकृत वृत्तीच्या 9 जणांकडून सोसायटी सचिव व कुटुंबियांना मारहाण...! 

लातुरात सोसायटीच्या वार्षिक सभेत मोठा राडा; त्या 9 जणांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल 

On
धक्कादायक : विकृत वृत्तीच्या 9 जणांकडून सोसायटी सचिव व कुटुंबियांना मारहाण...! 

मारहाण करणारे सगळे फरार, रात्री उशिरापर्यंत कोणीही अटक नाही 

Latur Yungdhar Society Rada लातूर / प्रतिनिधी : शहरात एक धक्कादायक घटना घडली असून सोसायटीच्या वार्षिक सभेत सचिवासह कुटुंबियांना जातीय - धार्मिक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाचे म्हणजे शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अद्यापपर्यंत अटक केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युंगधर सोसायटी आहे. या सोसायटीत एकूण २८ कुटुंब राहतात. या सोसायटीची वार्षिक सभा सर्व पदाधिकारी - रहिवाशी यांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आली. या सोसायटीच्या ग्रीनबेल्ट मध्ये श्री राम मंदिर असून या मंदिराला तेथील तीन कुटुंबियांचा विरोध असून त्या तीन कुटुंबियांकडून मंदिर परिसरात घरातील नालीचे पाणी सोडणे, जनावरांच्या मासांचे हाडे टाकणे असा प्रकार केले जातात असा आरोप इतर कुटुंबियांचा आहे.

वार्षिक सभा रविवार (दि.२९) रोजी दुपारी सुरु झाल्यास येथील जिहादी वृत्तीच्या तीन कुटुंबियांकडून वाद करत सोसायटीचे सचिव यांना त्यांच्या कुटुंबियांसह मारहाण करत जातीय शिवीगाळ, धार्मिक तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरून बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता, अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे हे अधिक तपास करत आहेत. 

28 कुटुंब राहतात...! 
युंगधर सोसायटीमध्ये एकूण २८ कुटुंब राहतात. परंतु यातील ३ कुटुंबियांची नेहमी इतर २५ कुटुंबाना त्रास होईल अशीच भूमिका असते,असा आरोप तिथे राहणाऱ्या परिवाराकडून आहे 

तपासावर परिणाम!

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री दोन दिवसीय लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पोलीस प्रशासन बंदोबस्त मध्ये आहे. कोणतेही मंत्री जिल्ह्यात आले की बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांचा मोठया प्रमाणात वेळ जातो आणि याचा पोलीस ठाणे हद्दीतील सर्वच तपासावर परिणाम होतो. पोलीस विभागात विविध पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यात आगामी विधानसभेच्या अनुषंगाने मंत्र्याचा वावर वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल...

याप्रकरणी शहजादी मुजीब शेख, सोहेल शेख, मुजीब शेख, आलीम शेख, सद्दाम शेख, इब्राहिम शेख, गोकुळ पाटील, शाम शेरखाने, शहनाज शेख यांच्यावर भारतीय न्याय संहिता व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांसर्वांनी सोसायटीत मिळून तक्रारकर्त्यांना तु क्या मंदीर बनाएगी तेरे  डब्बा, सब सामान उठाके फेक देंगे तु क्या उखाड़ेंगी म्हणुन जाती वाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार