मल्हारयोद्धा हजारे, गोयकर यांची जातपडताळणी कार्यालयाकडे आगेकूच! 

खिल्लारे कुटुंबियांचे बोगस प्रमाणपत्र रद्दची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार नसल्याचा निर्धार  

On
मल्हारयोद्धा हजारे, गोयकर यांची जातपडताळणी कार्यालयाकडे आगेकूच! 

लातूर/प्रतिनिधी : धनगर समाजाला मागील जवळपास 70 वर्षात सर्वच पक्षाच्या राज्यसरकारने वेळकाढूपणा केला असून धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच नाही. दोन कोटी लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला फक्त एका कुटुंबाच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचा तुघलकी कारभार सरकारच्या वतीने केला जात आहे. 

मागील २० दिवस लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आमरण उपोषण केले आता आमरण उपोषण थांबवून खिल्लारे कुटुंबियांचे बोगस जातप्रमाणपत्र रद्द करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जातपडताळणी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय उपोषणस्थळी शनिवार (दि.२८) रोजी धनगर समाजाच्या  बैठकीत झाला. उपोषणकर्त्यांना समाजबांधवांनी लातूर येथील उपोषण स्थगित केले. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील जातपडताळणी कार्यालयासमोर आंदोलन असल्याचे मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी जाहीर केले.

एसटी आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि आम्ही ते मिळवणारच, असा निर्धार मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी निर्धार व्यक्त केला. राज्य सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी बाबत तात्काळ निर्णय घेऊन न्याय दिला नाहीतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सरकारला चुकवावी लागेल. या आक्रमक पावित्र्यात धनगर समाज असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार