नागपूर हादरले! सेवानिवृत्त शिक्षकासह कुटुंबातील तिघांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत

तीन मृतदेहाचे हात पाठिमागून बांधलेले, आत्महत्या की हत्या संशय कायम ! पोलिसांकडून तपास सुरू

On
नागपूर हादरले! सेवानिवृत्त शिक्षकासह कुटुंबातील तिघांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत

Nagpur Crime News : राज्याच्या उपराजधानी नागपूर एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले आहे. विजय पचोरी असे या प्रकरणातील वडिलांचे नाव आहे. तर पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी असे इतर मृतकांची नावे आहेत. या घटनेने नागपूर जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

तीन मृतदेहांचे हात पाठीमागून बांधलेले...! 

तर या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. तसेच प्रकरणातील वडिलांनीच तिघांच्या हत्येनंतर स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप तरी या प्रकरणामागील कारण स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत असून तपासाअंतीच या प्रकरणामागील कारण कळू शकणार आहे.        

शिक्षकानेच आख्ख्या कुटुंबासह आयुष्य संपवलं?

मिळालेल्या प्राथमिक  माहितीनुसार, या प्रकरणातील वडील विजय पचोरी हे सेवानिव्रुत्त शिक्षक आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या व्यवसायातील आर्थिक तंगीमुळे कुटुंबात आधीच वाद सुरु सुरू होता. त्यामुळे या वाद अधिक विकोपाला गेला असावा आणि त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र दुसरीकडे प्रकरणातील चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकल्या अवस्थेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकरणातील वडिलांनीच तिघांची हत्या केली असावी आणि हत्येनंतर स्वत: आत्महत्या तर केली नाही ना? अशीही शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. मात्र, घटनेची सत्यात पोलीस तपासतूनच पुढे येणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.  

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार