नवरात्रीच्या नऊ दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या महत्व अन् काय त्याची मान्यता...!

घरोघरी झाली घटस्थापना,

On
नवरात्रीच्या नऊ दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या महत्व अन् काय त्याची मान्यता...!

Navratri 2024 Colours List With Date : नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपीत स्वरूपात साजरे होतात. तर चैत्र आणि शारदिय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे.

शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो.  

3 ऑक्टोबर गुरुवार - पिवळा

नवरात्रोत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते. हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो. 

4 ऑक्टोबर शुक्रवार - हिरवा

हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो. शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा. हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो. 

5 ऑक्टोबर शनिवार - राखाडी


राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो. 

6 ऑक्टोबर रविवार - नारंगी


केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते. हा रंग सकारात्मक उर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो. 

7 ऑक्टोबर सोमवार - पांढरा

पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो.

8 ऑक्टोबर मंगळवार - लाल


मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरा. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे. हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो.

9 ऑक्टोबर बुधवार - निळा


बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो. 

10 ऑक्टोबर गुरुवार - गुलाबी

गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवितो. या दिवशी महाष्टमी असते. देवी महागौरीचे पूजन करुन कन्या पूजन देखील केले जाते. 

11 ऑक्टोबर गुरुवार - जांभळा


जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी मिळते. त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत. 

12 ऑक्टोबर शनिवार - मोरपंखी रंग

मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास, दोन्ही रंगांच्या गुणांचा म्हणजेच समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार