महायुतीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तरी आहे का?, केवळ खोकेबाज नेते- नाना पटोलेंचा निशाणा

महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार, जनतेचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा

On
महायुतीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तरी आहे का?, केवळ खोकेबाज नेते- नाना पटोलेंचा निशाणा

Nana Patole on Mahayuti : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र सामोरे जाणार आहोत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी काही मोठा विषय नाही. महायुतीकडे चेहरा तरी आहे का? हा केवळ खोक्यांचा चेहरा असल्याची सडकून टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नाना पटोले हे एका मराठी वृत्तवाहिणीशी संवाद साधत होते. यावेळी त्यानी शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.

उद्यापासून आमच्या मॅरेथॉन बैठका

नाना पटोले म्हणाले  की, उद्यापासून आमच्या महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत. त्यामध्ये आम्ही जागावाटप संदर्भामध्ये ठरवणार आहोत. अल्पसंख्यांक उमेदवार द्यायचा की नाही निर्णय तेव्हाच घेऊ असेही ते म्हणाले. राज्यात कुठेही विकासकामे दिसत नाहीत. जिथे जावे तिथे खड्डेच खड्डे पडले आहे. मोदींकडून उद्घाटन करून घेतात. पण प्रत्यक्षात त्याचा लोकांना किती फायदा याचे काही भान ठेवणे महायुतीला गरजेचे आहे. हाच मुद्दा घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत.  

यांना साधी लाज देखील वाटत नाही

बदलापूर घटनेवर नाना पटोले यांनी भाष्य केले. पटोले म्हणाले की,या सरकारची आता कीव येऊ लागली आहे. या घटनेचे राजकारण करायचं नाही याचं भान आम्हाला आहे. सत्तेतील लोक मात्र राजकारण करत आहेत. गुन्हेगार शिंदे, खासदार शिंदे, मारणारा शिंदे, मुख्यमंत्री शिंदे या सगळ्या प्रकरणांमध्ये शिंदे दोषी कसे अशी खोचक विचारणा नाना पटोले यांनी केली.

ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये विविध घटना घडल्या आहेत. देवेंद्र फडणीसांच्या राज्यातही घटना घडल्या आहेत. यांना साधी लाज देखील वाटत नाही. यावर ते राजकारण करत आहेत. एन्काऊंटर झाला की आत्महत्या झाली याबाबत प्रकरण हायकोर्टामध्ये आहे. असे अनेक कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी रुजू केल्याची टीका त्यांनी केली. खऱ्या आरोपीला मदत करण्यासाठी माझ्या मुलाला मारले गेल्याचा आरोप आई-वडिलांनी केला असल्याचे नाना पटोले म्हणाले. ही घटना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस लपवत आहेत. जे दोषीत आहेत त्या सगळ्यांचे एन्काऊंटर करा अशी मागणी नाना पटोले यांनी केली. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार