मराठा आंदोलकांचा संयम सुटला: थेट तहसीलदारांचीच खुर्ची पेटवली; संभाजीनगर येथील घटना

On
मराठा आंदोलकांचा संयम सुटला: थेट तहसीलदारांचीच खुर्ची पेटवली; संभाजीनगर येथील घटना

संभाजीनगर :  मराठा आरक्षणासाठी सद्या मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांच्या समर्थनार्थ विविध जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. तर काही ठिकाणी मराठा आंदोलक आता आक्रमक होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशीच काहीशी धक्कादायक व  आंदोलक आक्रमक झाल्याची घटना संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात घडली आहे. मराठा आंदोलकांनी थेट तहसीलदारांची खूर्ची दालनाच्या बाहेर आणून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने काही काळ फुलंब्री तहसीलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 8 वा दिवस आहे. पण सरकारने अद्याप त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. यामुळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत. या आंदोलकांनी मंगळवारी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर तहसीलदारांच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणून ती पेट्रोल टाकून पेटवून दिली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी आंदोलकांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. तर आगामी काळात याहून अधिक आक्रमकपणे समाजबांधव होतील, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

ओबीसींचा मराठा आरक्षणाला विरोध

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. पण त्याला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यासंबंधी आंतरवाली सराटी येथून जवळच असलेल्या वडीगोद्री येथे प्रत्युत्तरादाखल उपोषण सुरू केले आहे. त्यांच्याही आंदोलनाला संमीश्र प्रतिसाद मिळत आहे. वडीगोद्री हे आंतरवाली सराटीला जाणाऱ्या रस्त्यातच आहे. त्यामुळे या ठिकाणी मराठा व ओबीसी आंदोलक समोरासमोर येण्याच्याही घटनाी घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला जात आहे.

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार