आता महाराष्ट्राचा सातबारा अदानींच्या नावावर करायचा आहे का, वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर निशाणा

अदानी फाऊंडेशनला सरकारी शाळेचे व्यवस्थापन दिल्याने विरोधक संतापले

On
आता महाराष्ट्राचा सातबारा अदानींच्या नावावर करायचा आहे का, वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर निशाणा

Vijay Vadettiwar Attacks On Eknath Shinde Fadnavis Govt  : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे सोपविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल करत शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

आता महाराष्ट्राचा 7/12 च अदानींच्या नावे करणार का?

आता महाराष्ट्राचा 7/12 च अदानींच्या नावे करणार का, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला केला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे.

काय म्हणाले वडेट्टीवार, पाहा- व्हिडिओ 

 

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर शासन निर्णयाची प्रत शेअर करत सरकारला जाब विचारला आहे. महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा 7/12 च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवले आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी या पोस्टमध्ये केला आहे. 

महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण

विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील विमानतळे अदानीला देण्यात येत आहेत. राज्यातील बंदरे अदानीला दिली जात आहेत. कोट्यवधी रुपयांची प्राइम जमीन आणि रेल्वे दिली जात आहे, केवळ शाळा बाकी होत्या, आता त्या देखील अदानीला दिल्या जात आहेत. शिक्षणाचे खासगीकरण करून आता शाळांमध्ये संघाचे विचार शिकवले जाणार, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे करावा अशी सरकारची मंशा आहे. असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. आता महायुती सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेला गुजरातकडे गहाण ठेवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत खेळणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची गरज आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार