पत्नीच्या निधनाने पती व्याकूळ झाला, त्याने तिसऱ्याच दिवशी गळफास घेऊन केली आत्महत्या

इंदापूरातील धक्कादायक घटना उघडकीस, नियतीच्या खेळात मात्र सात महिन्यांची चिमुकली पोरकी झाली

On
पत्नीच्या निधनाने पती व्याकूळ झाला, त्याने तिसऱ्याच दिवशी गळफास घेऊन केली आत्महत्या

Indapur Suicide News :  पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या पतीनेही आत्महत्या करत आयुष्याचा शेवट केला. दोनच दिवसांपूर्वी पत्नीचा आजाराने मृत्यू झाला तर आज पतीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जातीये.  मात्र, नियतीच्या या क्रूर खेळात मात्र 7 महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे.

मी थकलोय जरा आराम करतो म्हणून गेला आणि जीवन संपवलं

स्वप्नील सुतार असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्निल याची पत्नी श्रावणी सुतार हिचा डेंग्यूमुळे शुक्रवारी निधन झाले. आज स्वप्नील याने मी थकलोय जरा आराम करतो असे म्हणत घरातील खोलीत गेला. बराच वेळ झाल्याने घरातील नातेवाईकांनी त्याला हाका मारल्या.

मात्र आतून प्रतिसाद न आल्याने खिडकीतून डोकावून पाहता स्वप्नील याने छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार