मोदींनी उघडला पेटारा; आगामी निवडणुकीच्या तोंडावर झारखंडला दिला 83 हजार कोटींचा निधी

म्हणाले- झारखंडच्या विकासात काँग्रेस, झामुमो आणि आरजेडीची आघाडी ठरतेय सर्वात मोठा अडथळा

On
मोदींनी उघडला पेटारा; आगामी निवडणुकीच्या तोंडावर झारखंडला दिला 83 हजार कोटींचा निधी

Jharkhand Election 2024 Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी झारखंडच्या दौऱ्यावर होते. तेथे हजारीबागमध्ये त्यांनी 83 हजार 300 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या योजनांचे उद्घाटन केले. मतवारी मैदानावर परिवर्तन महारॅलीही काढण्यात आली. परिवर्तन रॅलीतील भाषणाची सुरुवात पंतप्रधानांनी जय जोहारने केली.

झारखंडच्या विकासात काँग्रेस, झामुमो आणि आरजेडीची आघाडी हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांना सत्तेवरून दूर केले तरच राज्याचा विकास होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मोदी म्हणाले की, झारखंडची लढाई सत्ता मिळविण्यासाठी नाही. तर रोटी, बेटी आणि माती वाचवण्यासाठी आहे. झामुमो आणि काँग्रेस झारखंडच्या तसेच देशाच्या सुरक्षेशी खेळत आहेत. एका कुटुंबाला ओळख देण्यासाठी काँग्रेसने आदिवासींची ओळख पुसून टाकली. सर्व योजना, सर्व रस्ते एकाच कुटुंबाच्या नावावर आहेत. अशा विचारसरणीमुळे देशाची मोठी हानी झाली. 

आदीवासींच्या घटत्या संख्येबाबत व्यक्त केली चिंता

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सर्व मुद्यांना हात घातला. ते म्हणाले, झारखंडची लोकसंख्या झपाट्याने बदलत आहे. संथाल परगनामध्ये आदिवासी लोकसंख्या कमी होत आहे. दुसरीकडे, घुसखोरांची संख्याही वाढत आहे. लोकसंख्येत झपाट्याने बदल होत आहेत. आदिवासी आणि हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. येथे घुसखोरांचा ताबा आहे. आदिवासी समाजातील मुली त्यांच्या निशाण्यावर आहेत. झारखंड हे आरजेडीसाठी लुटीचे ठिकाण होते. जल, जंगल, जमीन यांची लूट झाली. राजदला दिल्लीतून काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळत असे. त्यामुळेच झारखंड होऊ देणार नाही, असे ते म्हणायचे. दिल्लीतील काँग्रेस सरकारही यात सामील होते.

काँग्रेसवर साधला निशाणा

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, झारखंडचा लढा रोटी, बेटी आणि माती वाचवण्यासाठी आहे, सत्ता मिळविण्यासाठी नाही. भाकरी, बेटी आणि माती वाचवण्यासाठी हा लढा आहे. त्यामुळे आम्ही झारखंडमध्ये बदल घडवून आणू. काँग्रेसने एका कुटुंबाला ओळख देण्यासाठी आदिवासींची ओळख पुसली. सर्व योजना, सर्व रस्ते एकाच कुटुंबाच्या नावावर आहेत. अशा विचारसरणीमुळे देशाची मोठी हानी झाली. आमचे सरकार आदिवासी वीरांचा सन्मान करत आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार