नाही, नाही म्हणत धोनी 10 आयपीएल खेळतो, शाहरुख खानचा MS धोनीला खोचक टोला, VIDEO

On
नाही, नाही म्हणत धोनी 10 आयपीएल खेळतो, शाहरुख खानचा MS धोनीला खोचक टोला, VIDEO

Shahrukh khan : आयपीएल 2025 साठी धोनी अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत दिसून येण्याची शक्यता आहे. त्यातच, आयफा अवॉर्ड शो मधील कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानने महेंद्रसिंह धोनीबाबत केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

मी आणि महेंद्रसिंह धोनी हे लिजेंडरी आहोत, पण वेगळ्या कॅटेगिरीतील लिजेंडरी आहे. नाही नाही म्हणत धोनी 10 आयपीएल  खेळतो, असे म्हणत शाहरुखने धोनीला टोला लगावला.  

 

आयपीएल 2024 च्या रिटेशन पॉलिसीवरुन सध्या क्रिकेट जगतात धुमाकूळ सुरू आहे. त्यातच, बीसीसीआयने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात संघातील खेळाडूंना तब्बल प्रत्येक सामन्यासाठी तब्बल 7.5 लाख रुपये अतिरिक्त बोनस देण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे, यंदाच्या हंगामापूर्वीच आयपीएलचा सिझन चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात महेंद्रसिंग धोनी नेमका संघात दिसणार की मार्गदर्शकाच्या भूमिकेत, यावरुन जोरदार चर्चा आहे.

आयफा अवॉर्डमधील कार्यक्रमात शाहरुखने स्वत:च्या करिअरची तुलना महेंद्रसिंह धोनीच्या करिसोबत केली आहे. ''दिग्गजांची एक खास गोष्ट असते, कुठे थांबलं पाहिजे आणि कधी निवृत्ती घेतली पाहिजे हे त्यांना माहिती असतं. जसे की महान सचिन तेंडुलकर, महान फुटबॉलपटू सुनिल छेत्री आणि महान टेनिसस्टार रॉजर फेडरर. या सर्वांनाच माहिती आहे की, आपण आपल्या करिअरला केव्हा गुड बाय केलं पाहिजे, असा संवाद शाहरुख आयफा अवॉर्डमध्ये करण जोहरसमवेत करताना दिसून येतो.

तसेच, करण जोहर कधी निवृत्ती घेणार असा प्रश्नही शाहरुख विचारतो. त्यावर, करण जोहर देखील शाहरुखला प्रतिप्रश्न विचारतो. मग, हा प्रश्न तुम्हालाही लागू आहे, लिजेंडरी कॅटेगिरीतील तुम्ही कधी निवृत्ती घेणार आहात, असे करण जोहर म्हणतो. त्यावर, शाहरुखने मजेशीर उत्तर देत एम.एस.धोनीचा संदर्भ दिल्याचं पाहायला मिळत आहे.  

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार