मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी

सोयाबीन, कपाशी, तूर पीकविमाधारक शेतकऱ्यांना होणार फायदा

On
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी

Soybean Corp Insurance : पंतप्रधान पिकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीमबाबीअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व 52 मंडलांतील यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर पीकविमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा परतावा रकमेच्या 25 टक्के मर्यादत अग्रिम (आगाउ) रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

सोमवारी (ता. ३०) त्याबाबतची अधिसूचना काढली आहे.  यामुळे जिल्ह्यातील 7 लाख 12 हजार 867 शेतकऱ्यांना सुमारे 300 कोटी रुपयांवर अग्रिम विमा मिळू शकेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली,

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे अधिसूचित मंडलांतील पिकांच्या अपेक्षित उत्पादनात गत ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनते ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मयदित शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देण्याची तरतूद आहे.

यंदा परभणी जिल्ह्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली. जास्त पावसामुळे कपाशी, तूर पिकामध्ये मूळकुज झाली. सोयाबीन पिकामध्ये प्रतिकूल वातावरणामुळे कीड, रोगांच्या प्रादुर्भावाने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली. या पिकांच्या उत्पादनात सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक घट अपेक्षित आहे.

पर्जन्यमानातील असाधारण तफावत, नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थितीमुळे २५ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र या प्रातिनिधिक सूचकाआधारे तसेच राज्य शासन व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सोयाबीन, कपाशी, तूर या तीन पिकांच्या संभाव्य पीक विमा परतावा रकमेच्या २५ टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्सुरन्स कं. लि.ला आदेशित केले आहे. 

ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून १ महिन्याच्या आत परंतु राज्य व केंद्र शासनाचा प्रथम विमा हप्ता प्राप्त झाल्यानंतर या तरतुदीनुसार सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांकरिता सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करावी असे आदेश दिले आहेत.  मध्य हंगाम प्रतिकूलस्थिती विमाधारक शेतकरी पीक विमाधारक शेतकरी संख्या सोयाबीन ४,५०,६३० कपाशी १,६०,१२० तूर १,०२,११७ 

 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार