जागतिक टेस्ट क्रमवारीत टीम इंडिया टॉपवर! जाणून घ्या, कोणता देश कितव्या क्रमांकावर 

On
जागतिक टेस्ट क्रमवारीत टीम इंडिया टॉपवर! जाणून घ्या, कोणता देश कितव्या क्रमांकावर 

WTC Points Table : कानपूर कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा धुव्वा उडवला.  बांगलादेशचा पराभव करून भारतीय संघाने गुणतालिकेत सर्वोच्च स्थान कायम राखले आहे.  भारतीय संघाने गुणतालिकेत वरचे स्थान मिळवून ऑस्ट्रेलिया टीमला मागे टाकले आहे.  चला तर जाणून घेऊया, वर्ल्ड टेस्ट चॅम्पयिनशिपमध्ये कोणता देश कोणत्या स्थानावर आहे. 

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने या साखळीत आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले असून 8 सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. भारताला दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. टीम इंडियाचे 98 गुण आहेत. भारतानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

गुणांच्या विजयाच्या टक्केवारीचा विचार करता भारतीय संघ 74.24 गुणांसह वर्चस्व गाजवत आहे. गुणांच्या टक्केवारीत ऑस्ट्रेलियन संघ मागे आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 62.50 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, 12 पैकी 8 सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचे 90 गुण आहेत. दरम्यान, गुणतालिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंका संघाचे नाव आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा दारुण पराभव केला होता. त्यामुळ श्रीलंका संघाने देखील गुणतालिकेत झेप घेत तिसऱ्या स्थानावर आपले स्थान कायम ठेवले. या मालिकेत श्रीलंकेने नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकलेले आहेत. 

आज झालेल्या भारत बांगलादेश टेस्ट सामन्यामध्ये बांगलादेश संघाचे मोठे नुकसा झाले. बांगलादेशचा संघ आता सातव्या क्रमांकावर असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नाही. पाकिस्तानमध्ये मालिका जिंकल्यानंतर बांगलादेशचा संघ खळबळ माजवण्याच्या उद्देशाने भारतात आला होता, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली.

WTC गुण सारणी

भारत- 98 गुण
ऑस्ट्रेलिया गुण
श्रीलंका- 60 गुण
इंग्लंड- 81 गुण
दक्षिण आफ्रिका- 28 गुण
न्यूझीलंड- 36 गुण
बांगलादेश- 33 गुण
पाकिस्तान- 16 गुण
वेस्ट इंडिज- 20 गुण

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार