बीड जिल्ह्यात यंदा दोन दसरा मेळावे होणार; पंकजा मुंडेनंतर नारायण गडावरुन जरांगेंचाही एल्गार

On
बीड जिल्ह्यात यंदा दोन दसरा मेळावे होणार; पंकजा मुंडेनंतर नारायण गडावरुन जरांगेंचाही एल्गार

Manoj Jarange Patil Dusra Melava : महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्याची अन् विचारांचं सोन लुटण्याची परंपरा आहे. शिवतीर्थावरील शिवसेनेचा मेळावा असो की पंकजा मुंडे यांच्याकडून घेतला जाणार मेळावा असो. यात आणखी एका मेळाव्याची भर पडणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही यंदा बीड जिल्ह्यातील नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. नुकत्याच झालेल्या मराठा समाजाच्या मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे याच मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे देखील रणशींग फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बीडमध्ये झालेल्या बैठकीत झाला निर्णय

बीड जिल्ह्यात भगवानगडावरील पंकजा मुंडे यांचा मेळावा दरवर्षी घेतला जातो. त्यात बीड जिल्ह्यात आता यंदा दोन मेळावे होणार आहेत. कारण जरांगे यांच्या मेळाव्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज नारायणगडावर पार पडली. या बैठकीसाठी मराठा कार्यकर्त्यांची मोठी हजेरी होती. या बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचा गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे. 

नारायणगडावरून जरांगेंनी फुंकले रणशिंग

राज्यात दसरा मेळाव्याची अनेक ठिकाणी परंपरा आहे. बीडच्या सावरगाव घाट मध्ये पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा प्रसिद्ध आहे. आता नारायणगडावर मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नारायणगडावर मराठा समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आलीय. आज दुपारी तीन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात होते. या बैठकीतच मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतला आहे.

 

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार