ब्राम्हण असूनही सावरकर गोमांस खायचे, 'त्या' मंत्र्याच्या दाव्यानं वातावरण तापलं

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्र्याच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटणार

On
ब्राम्हण असूनही सावरकर गोमांस खायचे, 'त्या' मंत्र्याच्या दाव्यानं वातावरण तापलं

Karnataka Minister Dinesh Gundurao : एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी केलेल्या विधानवरुन चांगलच राजकारण तापलं आहे. काँग्रेसच्या या मंत्र्यानं सावरकर हे मांसाहारी असल्याचं सांगून, त्यांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नसल्याचा दावा केलाय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्र्‍याच्या या दाव्यामुळे चांगलंच वातावरण तापलंय. 

नेमकं काय म्हणाले मंत्री गुंडुराव

मंत्री दिनेश गुंडुराव म्हणाले की, सावरकरांबद्दल लोक असे बोलतात की ते ब्राम्हण होते. मात्र उघडपणे मांस खायचे. त्याचा प्रचारही करायचे. त्याऊलट महात्मा गांधी हे हिंदू संस्कृतीवर विश्वास ठेवणारे होते. ते कट्टर शाकाहारी होते. सर्व दृष्टीने गांधीजी हे लोकशाहीवादी व्यक्ती होते. मोहम्मद अली जिन्नांच्या तुलनेत सावरकर हे अधिक कट्टरतावादी होते. सावरकरांची विचारधारा वेगळी होती. त्यांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नाही. 

आरएसएस, हिंदू महासभेवरही केली टिका

मंत्री गुंडुराव म्हणाले की, सावकरांची विचारधारा ही हिंदू संस्कृतीपेक्षा वेगळी होती. आरएसएस, हिंदू महासभा, व अन्य कट्टरपंथी समाजात द्वेष पसरवतात. जिन्ना हे कट्टर मुस्लिमपंथीय होते, मात्र तेही डुकराचं मांस खात होते. देशात गोडसेच्या कट्टरवादी विचाराची पाळमुळं घट्ट होत असल्याचा दावा, दिनेश गुंडुराव यांनी केला. 
सावरकरांचा कट्टरवाद हा देशाला धोकादायक आहे, असंही गुंडुराव यांचं म्हणणं होतं. 

वक्तव्याचा भाजपने केला निषेध

काँग्रेसच्या मंत्र्यानं केलेल्या या विधानानंतर भाजपने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. काँग्रेस खोटारडी असल्याचा पलटवार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केला. भाजपने गुंडुराव यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. भारत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असे ठाकुर म्हणाले. त्यांच्याकडून काँग्रेसने अद्याप कोणताच बोध घेतला नाही. काँग्रेस स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करत नाही, हे पुन्हा सिद्ध झाल्याचा दावा ठाकुर यांनी केला. काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्त्वात तुकडे-तुकडे विचारधारेला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही मंत्री ठाकूर यांनी केला.  

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार