जम्मू-कश्मीरमध्ये 3ऱ्या टप्प्यातील 40 जांगासाठी उद्या मतदान, मतदार किती, किती आहेत मतदान केंद्र

On
जम्मू-कश्मीरमध्ये 3ऱ्या टप्प्यातील 40 जांगासाठी उद्या मतदान, मतदार किती, किती आहेत मतदान केंद्र

jammu and kashmir election 2024 3rd Space : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी शांततेत संपला. उद्या 1 आॅक्टोबर रोजी मतदा होणार आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचे मुख्य मुद्दे ‘कलम 370’ आणि ‘राज्याचा दर्जा’ हे होते. अंतिम टप्प्यात 40 जागांसाठी 415 उमेदवार रिंगणात आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त पांडुरंग पोले म्हणाले की, 5060 मतदान केंद्रांवर 39 लाखांहून अधिक मतदार मतदान करतील.

राजकीय पक्षांची अनेक आश्वासने

विकास, आरोग्यसेवा, शिक्षण, चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, परवडणारी वीज आणि नागरी सुविधा हा प्रत्येक राजकीय पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यांचा भाग होता, पण शेवटी लढा 'कलम 370' आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणाऱ्यांमध्येच होता. विशेष म्हणजे, नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) सारख्या प्रादेशिक पक्षांसाठी 'कलम 370' पुनर्स्थापित करणे सर्वात महत्वाचे होते, परंतु राज्याचा दर्जा हे प्रत्येक राजकीय पक्षाने दिलेल्या घोषणापत्रातील वचनांपैकी एक होते.

किती उमेदवार रिंगणात?
40 जागांसाठी एकूण 415 उमेदवार रिंगणात आहेत.

जम्मूमध्ये 109 
बारामुल्लामध्ये101 
कुपवाडात 59 
बांदीपोरामध्ये 42 
उधमपूरमध्ये 37 
कठुआमध्ये 35 
सांबामध्ये 32 

पीएम मोदी, अमित, खर्गे, सचिनसह अनेक नेत्यांच्या सभा
विधानसभा निवडणुकीत NC सोबत पूर्वीची युती असूनही, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात किंवा राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सचिन पायलट आणि प्रियंका गांधी यांच्या प्रमुख नेत्यांच्या भाषणात कलम 370 बद्दल काहीही बोलले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर सर्व वरिष्ठ भाजप नेत्यांनी मतदारांना सांगितले की केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा तात्पुरता आहे आणि जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल केला जाईल. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार