धनगर आरक्षणासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता आज रास्ता रोको

रास्ता रोकोसाठी समाजवाबांधवांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा - सकल धनगर समाज

On
धनगर आरक्षणासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता आज रास्ता रोको

Dhangar reservation hunger strike लातूर / प्रतिनिधी :  मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरु असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ व धनगर समाजास  तातडीने आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार (दि. 23) सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले आहे. या रास्ता रोकोसाठी समाजबांधवांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

धनगर आरक्षणासाठी समाज सातत्याने संघर्ष करीत आहे. आरक्षणाअभावी होत असलेली समाजाची परवड दिसत असताना सरकार व विरोधक हा प्रश्न गांभिर्याने न घेता त्याचे सातत्याने राजकारण करीत आहेत. शिक्षण घेऊन नोकरी मिळत नसल्याने अनेक युवकांनी आत्महत्या केल्या आहेत व त्या सुरुच आहेत. आर्थिक हतबलतेने अनेकांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत आहे. या आपत्तीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी धनगर समाजास एसटी आरक्षण मिळणे हाच एकमेव पर्याय आहे.

हे आरक्षण मिळावे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर येथे मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर हे आमरण उपोषण करीत आहेत. त्यांची प्रकृती ढासळली आहे तरिही शासन हा विषय मार्गी लावण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. विरोधकही या प्रश्नाशी आपले काही एक देणेघेणे नाही आशा भूमिकेत आहेत याच्या निषेधार्थ, तसेच उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ आरक्षणासाठी हा रास्ता रोको असल्याचे समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात आले.

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार