मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : अहमदनगरच्या 'अहिल्यादेवी' नामांतरास मंजुरी

राज्यसरकारने पाठलेल्या प्रस्तावाला अखेर मिळाली मंजुरी

On
मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : अहमदनगरच्या 'अहिल्यादेवी' नामांतरास मंजुरी

मुंबई : विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही लागू शकते. त्यामुळे राज्यासह केंद्रातील मंत्रिमंडळाकडून महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर धडाधड निर्णय घेतले जात आहे. त्याच अतिशय महत्त्वाची बातमी देखील समोर आली आहे. एकीकडे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने तब्बल 33 मोठे निर्णय घेण्यात आले. तर दुसरीकडे केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाच्या वतीने देखील महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्यात आला. 

अहिल्यानगरला मोदी मंत्रिमंडळाची मंजुरी

विधानसभेपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तर आज आणखी एक मोठा निर्णय घेत राज्यातील अहमदनगर जिल्‍ह्याचे नाव 'अहिल्‍यानगर' असे नामांतर करण्याची मागणीला मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे. 

महाराष्ट्र विधानसभा कधीली लागू शकतात. त्यामुळे महायुती सरकारने त्यापूर्वी जणू निर्णयांचा धडाका सुरू केल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.10) राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात ही दुसऱ्यांदा घेतलेली राज्य मंत्रिमंडाळाची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयामध्ये प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाच्या दंडाची तरतूदही आज राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

विखे पाटलांनी मानले मोदींचे आभार...!

अहमदनगर जिल्‍ह्याचे नाव 'अहिल्‍यानगर' असे करण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून होत होती. यादरम्यान राज्य सरकारने या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर अखेर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. तर त्यांनी आभार देखील मानले. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार