आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, आरक्षणाबाबत शरद पवारांचे मोठे विधान

म्हणाले- ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करा, मराठा आरक्षण मिळावे ही लोकांची भावना

On
आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, आरक्षणाबाबत शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar on Reaervation : आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येतील असे मत शरद पवार यांनी केलं. यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार  घ्यावा, आम्ही त्याबाबाबत पाठींबा देऊ असेही शरद पवार म्हणाले. 

मराठा आरक्षण मिळावे ही लोकांची भावना 
मराठा आरक्षण मिळावे ही लोकांची भावना असल्याचे शरद पवार म्हणाले. इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही पवार म्हणाले.

प्रसिद्धीसाठी असे लोक बोलत असतात

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टिका केली. त्यांना एकही जागा निवडूण आणता आली नाही. ते लोक माझ्यावर बोलतात, हे प्रसिद्धीसाठी बोलत असतात असं म्हणत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला. 

वय वाढते तशी एनर्जीही वाढते
तुम्हाला एवढी एनर्जी येते कुठून? असा प्रश्न देखील प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांनी विचारला. यावेळी शरद पवार म्हणाले की, जसे जसे वय वाढते तस तशी एनर्जी वाढते. यावेळी बोलतना शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्याबबातही प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरी  यांचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांना जे योग्य वाटते ते भले सरकारच्या विरोधात असतील तरी बोलतात असंही शरद पवार म्हणाले. एमआयएमने दिलेल्या प्रस्तावाबाबत देखील शरद पवारांना विचारण्यात आले, यावेळी पवार म्हणाले की, कुणी काय प्रस्ताव दिलाय हे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पाहतात, मला याबाबत काही कल्पना नसल्याचे पवार म्हणाले. मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबाबाबत आता आमचे जयंत पाटील काही बोलत नाहीत. आम्हाला जे लोक भेटून जातायेत ते आमचे जुने मित्र असल्याचे शरद पवार म्हणाले. 

शाह यांच्या 18 ठिकाणी सभा,  त्यात 14 ठिकाणी पराभव 
अमित शाहा यांचा अलीकडे महाराष्ट्रात मुक्काम जास्त असतो याबाबत प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांनी विचारले. यावेळी शरद पवार म्हणाले की, देशाचा गृहमंत्री भाषणात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा असे बोलतात. लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांच्या 18 ठिकाणी सभा झाल्या होत्या. यामध्ये 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाल्याचे शरद पवार म्हणाले. त्यामुळं यावेळी देखील त्यांनी जास्त सभा घ्याव्यात असा टोला शरद पवार यांनी लगावला.   

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार