RSS मुख्यालय आता नागपूर नव्हे दिल्लीत?, रेशीमबाग ते ‘केशवकुंज’ चा प्रवास...!

अडीच एकर परिसर, सरसंघचालकांचे निवासस्थान ते एकाचवेळी 200 कार पार्किंगची सोय, वाचा सविस्तर...!

On
RSS मुख्यालय आता नागपूर नव्हे दिल्लीत?, रेशीमबाग ते ‘केशवकुंज’ चा प्रवास...!

RSS New Headquarters in Delhi Kevashkunj : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा शब्द काढला की नागपूर हे नाव आपसूकच आपल्या प्रत्येकाच्या तोंडात येते. त्याचे कारण देखील तसेच आहे. संघाची स्थापना ही नागपूरात  केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. इवलेसे रोपटे लावलिया द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. अगदी अशीच प्रगती ही संघाच्या कामाची आहे. 

नागपूरातून सुरू झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम हे आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पसरले आहे.  दरम्यान,  संघाचे मुख्यालय आता बदलणार आहे, अशी चर्चा दिल्लीत होऊ लागली आहे.  त्याचे कारण असे की, दिल्लीतमध्ये संघाचे मुख्यालय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी केशवकुंज नावाची संघाची इमारत बांधून पूर्णत्वास येत आहे. या ठिकाणी सरसंघचालकांसह  संघाच्या प्रमुख नेत्यांची निवासस्थानाची व्यवस्था असणार आहे.  

अडीच एकरात उभारले जात आहे 'केशवकुंज'

दिल्लीतील झंडेवालान येथे ‘केशवकुंज’ हा भव्य दिव्य परिसर अडीच एकरातील जागेवर थाटात उभा राहिला आहे. येत्या काळात ‘केशवकुंज’ स्वयंसेवकांना प्रेरणा देण्यासाठी तत्पर असेल. एवढेच नव्हे तर संघाच्या चळवळीचे कार्यक्षेत्र देखील असेल.

मोहन भागवत दिल्लीत जाणार?

गेल्या काही दिवसांपासून शिफ्टिंग काम सुरु आहे. देशाच्या राजधानीत आरएसएसचे (RSS) नवे मुख्यालय तयार झाले आहे. यामुळे सरसंघचालक मोहन भागवत लवकरच दिल्लीतील ‘केशवकुंज’ या संघाच्या नव्या मुख्यालयात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजधानीत सुरु झाली आहे.

झंडेवालान मंदिराजवळ ही इमारत आहे. सुरक्षा व्यवस्थेतबाबतचे मॉकडील नुकतेच करण्यात आले. खरं तर सत्ताधारी भाजपाचे मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नव्या मुख्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. देशाच्या राजधानीत आरएसएसचे नवे मुख्यालय तयार झाले आहे. 

सीसीटीव्हीची नजर तर सीआयएसएफची असेल सुरक्षा..! 

तसेच आरएसएस चे मुखपत्र असलेले पांचजन्य आणि ‘ऑर्गनाइजर’ चे कामही येथून चालणार आहे. दिल्लीतील संघाचे कार्यालयही या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. ‘केशवकुंज’ वर CCTV ची नजर असणार आहे, सुरक्षेसाठी CISF चे जवान तैनात असणार आहेत. RSS प्रमुख डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांचा पुतळा या परिसरात आहे. संघाच्या संबधित विविध संघटना, संस्था यांची कार्यालयही या ठिकाणी असणार आहेत. आठ वर्षांपासून या इमारतीचे काम सुरु होते.

image (100)
सदर फोटो हा नागपूरमधील संघ मुख्यालयाचा आहे. या ठिकाणी डॉ. हेडगेवार यांची समाधी आहे. देशभरातील संघ स्वयंसेवक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात. संघाच्या तृतीय वर्षाचा अभ्यासवर्ग याच ठिकाणी होतो.

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज इमारत

केशवकुंजमधील पहिल्या टॉवरमध्ये पांचजन्य आणि ‘ऑर्गनाइजर’ यांचे कार्यालय आहेत. दिल्लीतील संघाचे कार्यालयही या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. अडीच एकर परिसरात असणाऱ्या ‘केशवकुंज’ मध्ये मोठे वाहनतळ उभारण्यात आले आहे. याठिकाणी २०० कार पार्क करता येणार आहेत. या इमारतीत २० खाटांचे छोटेखानी रुग्णालय उभारण्यात आले आहे. बारा मजल्यांच्या ‘केशवकुंज’ या इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र व ‘कम्प्लिशन सर्टिफिकेट’ (सीसी) मिळाले आहे.

12 मजली इमारत असेल, तेरा लिफ्ट, प्रत्येक टॉवरवर 80 खोल्या...! 

केशवकुंजमध्ये तीन टॉवर असून प्रत्येक टॉवरमध्ये १२ मजले आहेत. यामध्ये एकूण १३ लिफ्ट आहेत. येथे कार्यालयासोबत सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह, सहकार्यवाह आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे निवासस्थान असणार आहे.

New Project - 2024-10-02T004729.251
आतापर्यंतचे सरसंघचालकांचा एकत्रित फोटो...विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत हे 2009 सालापासून सरसंघचालक पदावर कार्यरत आहेत.

प्रत्येक टॉवरवर ८० खोल्या आहेत. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या संघ या संस्थेची सुरुवातीची प्रेरणा म्हणजे चारित्र्य प्रशिक्षण देणे आणि हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी “हिंदू शिस्त” लावणे.

हेडगेवारांनी केली संघाची स्थापना...! 

हिंदुत्वाची विचारधारा हिंदू समाजाला “बळकट” करण्यासाठी प्रसारित करणे आणि भारतीय संस्कृती आणि तिची सभ्यता मूल्ये टिकवून ठेवण्याच्या आदर्शाला प्रोत्साहन देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. आरएसएस (RSS) ची स्थापना १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती.

Edited By- Subhaputra 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार