भाजपचे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही, अहो या लोकांनी शिवरायांच्या पुतळ्यातही पैसे खाल्ले

उद्धव ठाकरे यांचा मोदी शहांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले- महाराष्ट्र गिळायला म्हणून यांचा माझ्यावर काट

On
भाजपचे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही, अहो या लोकांनी शिवरायांच्या पुतळ्यातही पैसे खाल्ले

मी आज नागपूर शहरात आलो. नागपूर म्हटले की, संघाचे मुख्यालय. माझा सरसंघचालक मोहन भागवत यांना सवाल आहे की, त्यांना भाजपचे सद्याचे हिंदूत्व मान्य आहे का, कोणीही गुंड, भ्रष्टाचारी आणायचे अन् भाजपात समावेश करून घ्यायचे, ही भूमिका तुम्हाला मान्य आहे का, असा खडा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते नागपुरात बोलत होते.  यावेळी त्यांनी मालवण येथील शिवरायांचा कोसळलेल्या पुतळ्यावरुन मोदी शहांवर निशाणा साधला.  

ठाकरे म्हणाले की, आज नागपुरात मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. शिवप्रेम शिकवावे लागत नाही. ते जन्माला आलेल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या रक्तात आहे. परंतु, या दैवताच्या कामात देखील मोदी शहांच्या बाजारबुणग्यांनी पैसे खाल्लेत याचे खूप वाईट वाटते. लोकसभा जिंकायची म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकणात आले. त्यांनी नौदल दिन साजरा केला. त्याचा अभिमान आहे. पण नौदलाचे आरमार ज्यांनी उभारले त्या शिवरायांच्या पुतळ्यात पैसे तुम्ही खाल्लात हे अतिशय वाईट गोष्ट आहे. महाराष्ट्र तुम्हाला कदापी माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.

जात प्रमाणपत्र अवैध ठरवणाऱ्यांना शासन झालेच पाहिजे

बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ज्यांनी ठरवलं, त्यांच्यावर तर कारवाई केली पाहिजे, तेव्हा म्हणावे लागेल की, लोकशाही जिवंत आहे. मुंबईत काल सिनेट निवडणूक झाली. त्यात शिवसेनेला लोकांनी भरगोच्च मतदान केले. अभाविपच्या सर्व उमेदवारांना जेवढी मत मिळाली. तेवढी मत तर शिवसेनेच्या एका उमेदवाराला देण्यात आली.

मोहन भागवतांना केला सवाल, तुम्हाला भाजपचं हिंदूत्व मान्य आहे का?
आम्ही म्हणजे मुनगंटीवार नाही. बोलतात काय, जातात कुठे, त्यांनी युती तोडली. 2019 साली आम्ही हिंदू होतो. मग मी कॉंग्रेससोबत गेलो तर म्हणे मी कॉंग्रेसवाला झाला आहे. भाजपचं हिंदूत्व आम्हाला मान्य नाही. मोहन भागवतांना माझा प्रश्न आहे. की भाजपचे हिंदूत्व तुम्हाला मान्य आहे का?, केवळ मौनव्रत बाळगणार आहात का, भाजपच्या या धोरणावर तुम्ही बोलणार आहात की नाही, असा सवाल देखील ठाकरे यांनी मोहन भागवत यांना केला.

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार