अमित शाह- अजित पवारांचं काय ठरलं? सह्याद्रीवर झाली खलबतं, वाचा सविस्तर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मुद्द्यावर निघू शकतो तोडगा, नेमकं काय घडलं..!

On
अमित शाह- अजित पवारांचं काय ठरलं? सह्याद्रीवर झाली खलबतं, वाचा सविस्तर

Amit Shah- Ajit Pawar meeting in Sahyadri :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल मंगळवारी दिवसभर तर आज देखील त्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. आज सकाळीच अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. तेथे अमित शाहांची अजितदादा व त्यांच्या गटाशी चर्चा सुरु आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरेही यांच्यात सकाळपासून चर्चा सुरु झाली. घटस्थापनेच्या दिवशी महायुतीची पहिली यादी जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार व भाजपमधील ज्या जागांचा वाद सुरु आहे, तो वाद या बैठकीनंतर मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमित शहांची महायुतीतील नेत्यांशी चर्चा

अमित शाह आज सकाळीच सह्याद्री अतिथीगृहावर आले. तेथे बैठक सुरू झाली. अमित शाहांनी सुरुवातीला अजित पवारांशी चर्चा केली. यावेळी पवारांसह, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. ज्या जागांवर तिढा आहे आणि अजितदादा गटाने ज्या जागांवर दावा केला आहे, त्यावर अमित शाह हे अजितदादांशी चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवारांच्या बैठकीनंतर अमित शहा हे शिंदे गटाशीही चर्चा करणार आहेत. त्यानंतर रात्री उशीरा महायुतीच्या तिन्ही स्थानिक नेत्यांशी चर्चा करून फायनल निर्णय आज घेणार असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोणत्या मुद्द्यांवर सुरु आहे चर्चा?

महायुतीत भाजपच मोठा भाऊ असल्याचं सांगितलं जात आहे. 155 ते 160 जागा भाजप लढवेल, अशीही चर्चा आहे. दुसरीकडे अजित पवार गट या जागावाटपावर नाराज असल्याचंही काहींचं म्हणणं होतं. जागावाटपाचा फार्म्यूला हा सेटिंग-गेटींगवर आधारीत आहे. म्हणजेच ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार आहे, त्यालाच ती जागा सोडण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्रात 2019 ला अनेक जागांवर भाजप व राष्ट्रवादीतच मुख्य लढत झाली होती. त्यात भाजपचा  आमदार विजयी झाला तेव्हा अजितदादांचा उमेदवार पराभूत झाला होता. तर काही जागांवर अजितदादांचा उमेदवार निवडून आला होता तेथे भाजपचा उमेदवार पराभूत झाला होता. या जागांवर या सेटिंग-गेटींग फाँर्म्यूल्यामुळे वाद सुरु आहे. दोन्ही पक्षात बंडखोरीची शक्यता वाढली आहे. त्यामुळे याच मुद्यावर अमित शहांची सध्या बैठक सुरु असल्याचं समजतं.

तीन महत्त्वाच्या मुद्यांवर निघणार तोडगा

अमित शाह आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अमित शाह हे आज जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करूनच जाणार असल्याचं समजचं. निवडणुका कधीही लागू शकतात. वेळ कमी आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला आधी निश्चित केला जाणार आहे. त्यानंतर जागा वाटपाचा इतर तिढा सोडवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय राज्यातील वादग्रस्त जागांबाबतही या बैठकीत फैसला होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जागांवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे, हा गुंता आज अमित शहा सोडविणार असल्याचं समजतं.
 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार