चाकूर शहर वाढीव पाणीपुरवठा प्रकल्पाचा शुक्रवारी भव्य भूमीपूजन समारंभ...!

आ. बच्चू कडू यांच्या हस्ते होणार 75.49 कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; मान्यवरांची असेल मांदीयाळी

On
चाकूर शहर वाढीव पाणीपुरवठा प्रकल्पाचा शुक्रवारी भव्य भूमीपूजन समारंभ...!

चाकूर / ओमप्रकाश लोया : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत" राज्य शासनाने चाकूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 75. 49 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. चाकूर येथील सोसायटी चौकात या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आ.बच्चू कडू यांच्या हस्ते शुक्रवार (दि. 4) रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

New Project - 2024-10-02T221302.301

शहरातील सोसायटी चौकात शुक्रवारी "महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत" चाकूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, राज्यसभेचे खासदार डॉ.अजित गोपछेडे, भाजपच्या लातूर शहराच्या विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळभाऊ माने, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, चाकूर न.प.चे मुख्याधिकारी प्रतिक लंबे, चाकूर न.प.चे उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार, गटनेते अब्दुलकरीम गुळवे, गटनेत्या हिरकणा लाटे, स्वछता व आरोग्य सभापती वैशाली कांबळे, महिला व बालविकास सभापती शब्बाना सय्यद, विद्यमान बांधकाम सभापती तथा माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, पाणीपुरवठा सभापती भागवत फुले, नगरसेविका सुजाता रेड्डी, नगरसेवक साईप्रसाद हिप्पाळे, नगरसेवक मुज्जमिल सय्यद, नगरसेविका शाहिनबानु सय्यद, नगरसेविका ज्योती स्वामी, नगरसेविका शुभांगी कसबे, नगरसेविका गोलावार नरसिंग, नगरसेविका गोदावरी पाटील, नगरसेवक अभिमन्यु धोंडगे, नगरसेवक नितीन रेड्डी, नगरसेवक विलासराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या योजनेमुळे चाकूरकरांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार असल्याचे आणि शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होणार आहे.

निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासन / वचन पूर्ण...

चाकूर नगर पंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष कपिल माकणे जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये त्यांनी चाकूरकरांना ठोस आश्वासने दिली होती. त्यामध्ये चाकूर शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते.

ही आश्वासने पाळत त्यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत" राज्य शासनाने चाकूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी ७५. ४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. नगराध्यक्ष कपिल माखणे आपल्या कौशल्य पूर्ण कामगिरी करत चाकूरकरांचे मन जिंकत आहेत. 

शिवपूर येथील घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी चाकूर ला आणण्यात यश आले. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. चाकूरकरांची तहान भागविण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार