भाजप आमदार गोपिचंद पडळकरांची पुन्हा शरद पवारांवर जहरी टीका

म्हणाले- शरद पवार म्हणजे मिनी औरंगजेब, त्यांना आयुष्यभरात शंभर आमदारही निवडून आणला आले नाही

On
भाजप आमदार गोपिचंद पडळकरांची पुन्हा शरद पवारांवर जहरी टीका

Gopichand Padalkar on Sharad Pawar :  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधत जहरी टीका केली आहे.

शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. आपल्या आयुष्यात शरद पवार फक्त दोन वेळेस रायगडावर गेले आहेत. नुकतेच शरद पवारांसमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आलीय. त्यामुळे ही घोषणाबाजी करणारे लोकं कोण आहेत? याची चौकशी झाली पाहिजे. सोबतच धनगर समाजाचे वाटोळे हे शरद पवारांनीच केले आहे. असा आरोपही पडळकरांनी केला. 

देवेंद्र फडणवीस हे गोगरीबांचे कवचकुंडल,,

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरिबांचे कवच कुंडल आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या दुकानाला कुलूप लावले, हे पवारांचे दुखणे आहे. त्यामुळं पवार साहेब देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत आहेत.

शरद पवारांच्या 50 वर्षाच्या राजकारणात कधी त्यांनी 100 आमदारही निवडून आणले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण काहीही बदलेले नाही. शरद पवार फुकटची हवा करत आहेत. त्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्तांनी आणि गरीब मराठ्यांनी जागे व्हायला हवं, असे आवाहनही आमदार गोपीचंद पडळकरांनी केले. 

गोपीचंद पडळकरांविरोधात आदिवासी संघटना आक्रमक

आदिवासी जाती जमातीमध्ये बोगस आदिवासींची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.  यामध्ये धनगर समाजाला देखील आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही प्रशासकिय अधिकारी प्रयत्न करीत आहे. तसेच आदिवासी विरोधात वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध म्हणून आज धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येत रास्ता रोको करत आंदोलन केले. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार