पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?

महिलांनी काय घ्यावी काळजी, कशी असतात प्राथमिक लक्षणे, वेळीच काळीज नाही घेतली तर.....!

On
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?

Heart Disease : हृदयविकार म्हणजेच हृदयाशी संबंधित आजार. मुख्यत्वे सामान्यतः पुरुषांनाच याचा जास्त धोका आहे असे मानले जाते. परंतु सत्य हे आहे की, महिलांनाही (Womens) हृदयविकाराचा धोका तितकाच गंभीर आहे, किंबहुना अनेक वेळा महिलांमध्ये हृदयविकाराचे लक्षणे स्पष्टपणे दिसून येत नाहीत, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिलांच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे अत्यावश्यक आहे. याबाबतची माहिती एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिजित बोरसे (Dr. Abhijit Borse) यांनी दिली आहे. जाणून घेऊयात... 

महिलांमध्ये हृदयविकाराचे लक्षणे...! 
पुरुषांप्रमाणे महिलांमध्येही हृदयविकाराची लक्षणे असतात, परंतु ती काही वेळा वेगळी किंवा सौम्य स्वरूपाची असतात. उदाहरणार्थ, छातीत तीव्र वेदना ही पुरुषांमध्ये हृदयविकाराचा प्रमुख लक्षण असते, तर महिलांमध्ये गळा, पाठ, खांदा, जबडा किंवा पोटात दुखणे, दम लागणे, थकवा, घाम येणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता ओळखण्यासाठी महिलांनी ही लक्षणे गांभीर्याने घेतली पाहिजेत.

का वाढतोय महिलांमद्ये हदयविकार? 


ताणतणाव आणि चिंता :

महिलांमध्ये ताणतणाव आणि मानसिक दडपण अधिक प्रमाणात आढळते. हे हृदयविकाराच्या जोखमीला चालना देऊ शकते.

हार्मोनल बदल :

रजोनिवृत्तीच्या आधी आणि नंतर होणारे हार्मोनल बदल हृदयविकाराचा धोका वाढवतात. इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी झाल्याने हृदयाचे रक्षण करणारे घटक कमी होतात.

लठ्ठपणा आणि डायबिटीज :

महिलांमध्ये वाढलेले वजन, विशेषतः पोटाच्या भागातील चरबी, हृदयविकाराचा धोका वाढवते. तसेच मधुमेह असलेल्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका पुरुषांपेक्षा अधिक असतो.

उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल :

उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल हृदयविकारासाठी प्रमुख घटक आहेत. परंतु महिलांमध्ये हे जोखमीचे घटक योग्य वेळी ओळखले जात नाहीत, ज्यामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते.

कशी घ्याल काळजी
  
नियमित तपासणी :

महिलांनी नियमितपणे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, आणि रक्तातील साखरेची तपासणी करून हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

व्यायाम आणि आहार :

संतुलित आहार, ताज्या फळा-भाज्या, आणि पूर्ण धान्यांचा आहारात समावेश करावा. दररोज ३० मिनिटं चालणे किंवा इतर प्रकारचा व्यायाम हा हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे.

धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन टाळा:

तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान हृदयविकाराचा धोका वाढवतात. त्यामुळे त्याचे सेवन पूर्णपणे टाळावे.

मानसिक ताण कमी करा :

योगा, ध्यान आणि इतर तणाव कमी करणाऱ्या क्रियांचा अवलंब करावा. मानसिक तणाव हृदयाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करतो, त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.

आरोग्य शिक्षण : महिलांनी हृदयविकाराच्या जोखमीबद्दल शिक्षण घेतले पाहिजे आणि हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूक राहिले पाहिजे.

लक्ष देणे का महत्त्वाचे...! 
आजही महिलांमध्ये हृदयविकाराबद्दल जागरूकता कमी आहे. त्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होते आणि त्यांच्यावर त्वरित उपचार होत नाहीत. हृदयविकार हा जगभरातील महिलांमध्ये मृत्यूचं प्रमुख कारण आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करणे, जागरूकता वाढवणे, आणि महिलांना त्यांची आरोग्य काळजी घेण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली, आहार आणि नियमित तपासणी यांचं महत्त्व ओळखून त्यानुसार पावलं उचलणे गरजेचं आहे. महिलांच्या हृदयविकाराबद्दलची ही शांतता मोडायला हवी, कारण आरोग्याचं रक्षण हेच खरं सामर्थ्य आहे, असे डॉ. अभिजित बोरसे यांनी म्हटले आहे.   

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार