छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 

On
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 

Chhattisgarh Naxalites Encounter :

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना नक्षलविरोधी अभियानात मोठे यश मिळाले आहे. बस्तर विभागातील नक्षलग्रस्त जिल्हा दंतेवाडा येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने तब्बल 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यात नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. 

बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी  माध्यमांशी बोलताना सांगितले की, नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील अबुझमदच्या थुलथुली गावाच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये 30 नक्षलवादी ठार झाले. विशेष व आनंदाची बाब म्हणजे रक्षा दलाचे सर्व जवान सुरक्षित आहेत. 

सुंदरराज म्हणाले की, नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या अबुझमद भागात माओवाद्यांचा वावर असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर रायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांमधून जिल्हा राखीव रक्षक आणि विशेष कार्य दलाच्या जवानांची एक तुकडी रवाना करण्यात आली होती.

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी देखील एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सदर कारवाईची माहिती देत सुरक्ष दलाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 14 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. यात नक्षलवाद्यांच्या मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता देखील  आहे.  तर सैनिकाचे देखील त्यांनी कौतुक केले.  

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार