नांदेडमधील CSC केंद्रचालकाचा कारनामा; लाडक्या बहिणींच्या पैशावरच टाकला डाका

On
नांदेडमधील CSC केंद्रचालकाचा कारनामा; लाडक्या बहिणींच्या पैशावरच टाकला डाका

CSC Kendrachalak Karnama : राज्य सरकारने महिलांसाठी आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकजण गैरव्यवहार करून पैसे हडपण्याचे प्रकार समोर येत आहेत. सातारा, अकोला जिल्ह्यातील प्रकरणे ताजी असतानाच आता नांदेड जिल्ह्यात देखील त्यापेक्षा वेगळा प्रकार समोर आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एका सीएससी केंद्र चालकाने आधार कार्डवर खाडाखोड करून लाडक्या बहिणींचे सुमारे 3 लाख रुपये हडप केले आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासानाने चौकशीचे आदेश दिले आहेत. आपले बिंग फुटताच केंद्र चालक फरार झाला आहे.

नेमके प्रकरण काय?

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना महिलांच्या आधारकार्डसोबत छेडछाड केली. पोर्टलवर महिलांचे आधारकार्ड नंबर टाकण्याऐवजी त्यांच्या पतीचे आधारकार्ड नंबर टाकले. त्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे आणि इतर योजनांचे पैसे आले आहेत, असे सांगून त्याने अनेकांचे आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक जमा करून घेतले.

याच कागदपत्रांच्या आधाराने त्याने महिलांच्या खात्यात आलेले लाडकी बहीण योजनेचे पैसे स्वत:च्या खात्यात जमा करून घेतले. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर आल्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे आले आहेत, असे सांगून त्या केंद्र चालकाने पुरुषांचे अंगठे घेतले. त्यानंतर बँकेत जमा झालेली रक्कम काढून घेतली.

केंद्र चालकावर गुन्हा दाखल

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या गैरव्यवहारात कोण कोण सहभागी आहेत, ते चौकशी झाल्यानंतर समोर येतील. संबंधित सीएससी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

71 जणांच्या खात्यातील पैसे उचलले या केंद्र चालकाने जवळपास ७१ जणांच्या आधार क्रमांकाचा वापर करून त्यांच्या परस्पर 3 लाख 19 हजार 500 रुपये उचलले. मनाठा या गावातील 38 तर बामणी फाटा गावातील 33 जणांच्या खात्यातील पैसे उचलण्यात आले आहेत. अनेकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर सीएससी केंद्र चालकाचा प्रकार उघडकीस आला.

याआधी गैरव्यवहार करुन योजनेचे पैसे लाटण्याचा प्रयत्न

दरम्यान, याआधीही गैरव्यवहार करून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याचा प्रकार सातारा आणि अकोला जिल्ह्यात उघडकीस आला होता. सातारा येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे २८ प्रकारचे वेगवेगळे फोटो काढून योजनेचे पैसे मिळवले होते. मात्र सरकारच्या संगणकीय प्रणालीत हा प्रकार उघड झाला होता.

यानंतर त्या व्यक्तीला सरकारची फसवणूक केल्याबद्दल तरुंगात टाकले होते. अजित पवार यांनी देखील हा किस्सा एका सभेत सांगितला होता. तर अकोला येथील सहा पुरुषांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. मात्र प्रशासनाच्या सीडींग प्रोसेमध्ये ही बाब लक्षात आली. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने त्या सहा पुरुषांचे आधारकार्ड निलंबित करण्यात आले. आता त्या सहा जणांना आधारकार्डवर मिळणाऱ्या कोणत्याही योजनांचा लाभ घेता येणार नाही. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार