आपले बुथप्रमुख हीच माझी शक्ती, माझ कुटुंब : मंत्री संजय बनसोडे यांचे प्रतिपादन

उदगीर मतदारसंघाची समतेचे आणि माणुसकीचे प्रतिक म्हणून ओळख

On
आपले बुथप्रमुख हीच माझी शक्ती, माझ कुटुंब : मंत्री संजय बनसोडे यांचे प्रतिपादन

Minister Sanjay Bansode उदगीर / प्रतिनिधी :  कोरोना महामारीच्या काळात आपण सर्वजण संयमाने काम केले. २०१९ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवुन मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आमदार ते राज्याचा कॅबिनेट मंत्री झालो आणि मागील ५ वर्षाच्या काळात मी उदगीर मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला आता आपले उदगीर जळकोट हे विकासाचे मॉडेल म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला येत आहे. हे केवळ आपल्यामुळेच शक्य झाले. माझी शक्ती, माझ कुटुंब आपण सर्वजण असल्याची भावना क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.

ते उदगीर - जळकोट विधानसभा मतदार संघातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, बुथ प्रमुख व प्रमुख पदाधिका-यांच्या संवाद बैठकीत बोलत होते.यावेळी अनेक मान्यवर आदी उपस्थित होते .

पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, आपण केलेली लोकहिताची व सामजिक कामे, नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सर्व सुख सुविधा आदी संदर्भातील कामे शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे मोठी ताकद निर्माण करा कारण आपल्या गावातला व वार्डातलाच बुथ कार्यकर्ता व बुथ प्रमुखच ही  आपली खरी ताकद असुन बूथ प्रमुख व प्रमुख पदाधिका-यांनी आता जोमाने कामाला लागावे असे आवाहन ना.संजय बनसोडे यांनी केले.


येत्या ३० सप्टेंबर रोजी जनसन्मान यात्रा व मतदार संघातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार असुन या कार्यक्रमास आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही ना.बनसोडे यांनी केले. यावेळी मतदार संघातील बुथ प्रमुख, पदाधिकारी व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार