धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ "तीन तास रस्ता रोको"; समाजाकडून शेकडो मेंढ्या आंदोलनस्थळी 

अहिल्यादेवी होळकर चौकाच्या सगळ्याच बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा..वाहतूकीचा खोळंबा

On
धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ

  

Latur Dhangar Samaj Rasta Roko Andolan लातूर / प्रतिनिधी : धनगर आरक्षणाच्या एसटी अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांचे धनगर आरक्षणासाठी गेल्या १५ दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ लातूर जिल्ह्यातील सकल धनगर समाजातर्फे सोमवार (दि.२३) रोजी तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

धनगर समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला वारंवार मुदत देऊनही आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा उपोषणाला बसावे लागले आहे. मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांची तब्येत खालावत असून सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे.

WhatsApp Image 2024-09-23 at 5.32.38 PM (1)

शासनाने आश्वासने देऊनही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने धनगर समाजाकडून आंदोलने करण्यात येत आहेत. सरकारला इशारा म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक बंद ठेवला.

WhatsApp Image 2024-09-23 at 5.32.39 PM

रस्त्यावर मेंढ्या थांबवून रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. यावेळी मोठया संख्येने धनगर समाज उपस्थित होता. यावेळी एक रुग्णवाहिका रस्त्यावर येताच आंदाेलकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन माणुसकीचे दर्शन घडवले.

उपोषणस्थळी महत्त्वाची बैठक

WhatsApp Image 2024-09-23 at 5.32.38 PM (2)

रस्ता रोको आंदोलनानंतर मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांच्या मार्गदर्शनात उपोषणस्थळी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली गेली. सरकार प्रत्येक वेळेस फसव्या घोषणा करत आहेत, त्यामुळे समाजाची दिशाभूल होत आहे. त्यामुळेच यापुढे एकजुटीने समाजाची दिशा ठरवून मार्गक्रमण असणार आहे, अशी भूमिका धनगर समाजाने यावेळी व्यक्त केली.

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार