मोठी बातमी : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना 15 दिवसांची जेलची शिक्षा, वाचा-नेमकं काय आहे प्रकरण?

On

15 days imprisonment for Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे खणून काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

या प्रकरणी  संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आला आहे.  25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने  निकाल दिला आहे.  2022 सालचे हे प्रकरण आहे.  मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यांवर आरोप केला होता.  

शौचालय घोटाळ्यात मेधा यांचा समावेश असा आरोप केला  

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मीरा भाईंदर येथील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राऊत जामीनास पात्र! 

15 दिवसाची कैद असल्याने संजय राऊत जामीनास पात्र आहे.  त्यानंतर  आता संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल. ते स्वत:ला सरेंडर करतील.  त्यानंतर कोर्ट त्यांना जामीन मंजूर करण्याची शक्यता आहे. सुनावणीवेळी संजय राऊत कोर्टात उपस्थित नव्हते. परंतु  कोर्टाने आपल्या नियोजीत वेळेत निकालाचे वाचन  पूर्ण केले आहे.   

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार