आमरण उपोषण आंदोलनाची तीव्रता वाढली; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

 3 वर्षाच्या चिमुकलीचा उपोषणकर्त्या वडिलांना वाढदिवसदिवसाला घरी नेण्याचा अट्टाहास !

On
आमरण उपोषण आंदोलनाची तीव्रता वाढली; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

Latur Dhangar reservation, 12 th day of hunger strike : लातूर / प्रतिनिधी :  एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी धनगर समाजाचे सुरू असलेले आंदोलन शुक्रवारी बाराव्या दिवशीही सुरूच होते. १२ व्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. लातूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात धनगर समाजाच्या विविध मागणीसाठी आंदोलन सुरु आहे.

धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊनही समाधानकारक तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. शासनाला मुदत देऊन ही दीड महिना झाला तरी तोडगा निघाला नाही. समाधानकारक तोडगा निघेपर्यंत आंदोलक मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर माघार घेण्यास तयार नाहीत.

उपोषणाच्या बाराव्या दिवशी समाजातील मान्यवर नेत्यांनी आंदोलनात भेट दिली. गणेश हाके , देविदास काळे,सचिन दाणे , पंढरीनाथ ढाले पाटील, पंजाबराव हराळ, दिनकरराव कोकरे, माधव कोळगावे, संभाजी बैकरे, नागनाथ गाडेकर, गंगाधर केराळे, दयानंद सुरवसे, बळ लक्ष्मण हाके, सतीश गाडेकर, ज्ञानोबा हांडे, लिंबराज केसाळे, विष्णु एनकफळे, महाळापा टेळे, संतोष जाधव यांनी भेट दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी आंदोलकांची प्रकृती खालावली आहे.

image (44)
3 वर्षाच्या चिमुकलीचा उपोषणकर्त्या वडिलांना वाढदिवसानिमित्त घरी येण्याचा अट्टहास केला.

चिमुकलीच्या वाढदिवसदिनीही 'वडिलां'नी जपलंय सामाजिक भान!

बाबा आज माझा 'बड्डे' आहे घरी चला अशी विनंती करीत 'स्नेहल' हि चिमुकली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात समाजाच्या आरक्षण संदर्भात मागील १२ दिवसापासून अमरण उपोषणास बसलेले वडील अनिल गोयकर यांना बिलगली. हे दृश्य पाहून उपस्थिततांच्या डोळ्यातून पाणी आले. 'स्नेहल' ही अनिल गोयकर यांची मुलगी असून तिचा वाढदिवस आहे. परंतु 'स्नेहल'च्या वडिलांनी आपल्या चिमुकलीच्या वाढदिवसदिवशीही सामाजिक भान राखत जीआर निघेपर्यंत उपोषणाचा निर्धार व्यक्त केला आहे. 

सोमवारी रास्ता रोको

धनगर समाज अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आमरण उपोषण करीत असलेल्या दोघांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या उपोषणाचा शुक्रवारी बारावा दिवस होता. तरीही शासन या उपोषणाची दखल घेत नाही. हे पाहूण सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार (दि.२३) रोजी सकाळी ११ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार