विश्वगुरु व्हायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा, नितीन गडकरींचे प्रतिपादन

गीता, कुराण आणि बायबलचा मूळ अर्थ सांगितला; म्हणाले- सामाजिक समरसतेचा मार्ग स्विकारावा लागेल

On
विश्वगुरु व्हायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा, नितीन गडकरींचे प्रतिपादन

Nitin Gadkari on Chhatrapati Shivaji Maharaj : आपल्या लोकशाहीची खरी कसोटी हीच आहे की, सत्तेत असलेल्या व्यक्तीने आपल्या विरोधात असलेलं जोरदार मतही सहन करावं आणि विरोध असेल तर आत्मपरीक्षण करावं, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. गडकरींनी  विचारवंत, तत्त्ववेत्ते आणि लेखकांनी कोणतीही भीती न बाळगता आपले मत मांडावे, असे आवाहन  केले. ते म्हणाले की, 'सध्या आपला देश मतभेदांचा नाही, तर मतभेदांच्या अभावाचा सामना करत आहे. विचारवंत, तत्त्ववेत्ते, लेखक यांना आपली मते देशाच्या आणि समाजाच्या हिताची वाटत असतील तर त्यांनी आपली मते मांडली पाहिजेत. पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

संविधानाचा दाखला देत नितीन गडकरी म्हणाले की, संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे या चार स्तंभांवर उभ्या असलेल्या आपल्याला लोकशाहीची जननी म्हटले जाते. आपली राज्यघटना प्रत्येकाचे हक्क आणि जबाबदाऱ्या नमूद करते. ही राज्यघटना विचारवंतांना कोणत्याही भीतीशिवाय राष्ट्रहितासाठी आपले विचार मांडण्याची मुभा देते.

राजाने प्रखर टीकेवर चिंतन करावं, टीका सहन करणं ही राजाची सर्वात मोठी परीक्षा असते असं गडकरी म्हणाले. आई मला नेहमी सांगायची लहानपणी निंदकाचे घर असावे शेजारी आपल्याला दिशा देणारा माणूस जो आहे तो आपल्याला सांगणार आहे आपले काय चुकलं काय बरोबर आहे. असंही गडकरी म्हणाले.

सामाजिक समरसतेचा मार्ग स्विकारावा लागेल
भारताला 'जागतिक नेता' व्हायचे असेल तर सामाजिक समरसतेचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे गडकरी म्हणाले. कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे या चार स्तंभांवर उभ्या असलेल्या आपल्याला लोकशाहीची जननी म्हटले जाते, असे ते म्हणाले. आपली राज्यघटना प्रत्येकाचे हक्क आणि जबाबदाऱ्या नमूद करते. गडकरी म्हणाले की, ही राज्यघटना विचारवंतांना कोणत्याही भीतीशिवाय राष्ट्रहितासाठी आपले मत मांडण्याची मुभा देते.

गीता, कुराण आणि बायबलचा मूळ अर्थ सांगितला
गडकरी म्हणाले की, जाती किंवा धर्माने प्रेरित सामाजिक विषमतेने देश पुढे जाऊ शकत नाही. गीता, कुराण आणि बायबलची मूळ कल्पना एकच आहे. देवाची प्रार्थना कशी करावी ही व्यक्तीची निवड आहे. आपल्याला जसे भाषण स्वातंत्र्य आहे तसेच आपल्याला धर्मस्वातंत्र्य आहे.

सामाजिक समरसतेतूनच देश विश्वगुरु बनू शकतो
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करून ते म्हणाले, 'शिवाजी महाराजांपेक्षा धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्त्वाचे दुसरे उदाहरण असू शकत नाही. इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे त्यांनी कधीच नष्ट केली नाहीत.विरोधी असणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला त्यांना घरी पाठवलं.  एका अर्थाने त्यांनी आदर्श राजाचा परिचय करून दिला.  सर्वधर्मसमभावाच जुन्या इतिहासातील सगळ्यात चांगलं उदाहरण कुठल असेल छत्रपती शिवाजी महाराज आहे याचा मला विश्वास आहे. आपला देश ‘विश्वगुरु’बनायचा असेल तर सामाजिक समरसतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. गडकरी यांनी भारतातील सामाजिक विषमता ही चिंताजनक प्रवृत्ती असल्याचे सांगितले आणि सांगितले की, माणसाचे व्यक्तिमत्व जात, भाषा, धर्म किंवा लिंग यावर अवलंबून नसते हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.

मत दिले नाही तरी काम करणार 
गडकरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात बरच जातीपातीचे राजकारण सुरू आहे, मी कधीही जात-पात पाळत नाही. मी 50 हजार लोकांसमोर सांगितलं, मी जात-पात पाळणार नाही,मी जातीपातीचे राजकारण करणार नाही. जो करेगा जात की बात उसको मारुंगा कसके लाथ, मला मत द्या देऊ नका मी सगळ्यांची काम करणार आहे. असेही गडकरी म्हणाले.  

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार