मविआच्या हातात जर सत्ता गेली तर ते राज्याचं वाटोळं करतील;  मुनगंटीवारांचा विरोधकांवर निशाणा 

महायुती पुन्हा सत्तेत येईल, व्यक्त केला विश्वास, अमित शहा आज संभाजीनगर दौऱ्यावर 

On
मविआच्या हातात जर सत्ता गेली तर ते राज्याचं वाटोळं करतील;  मुनगंटीवारांचा विरोधकांवर निशाणा 

Sudhir Mungantiwar : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर राज्याची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात जर गेली तर ते राज्याचे वाटोळं करतील, असा गंभीर आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. तर आज संभाजीनगरातून अमित शहा हे विधानसभा निवडणुकीचा शंखनाद करतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.  

विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यातून निवडणूकीचा शंखनाद करणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवर म्हणाले. लोकसभेत आम्ही थोडे बेसावध राहिलो तर काँग्रेस महाविकास आघाडीनं फेक नॅरेटीव्ह सेट केलं. आरक्षण, सोयाबीन, कापूस, जातीय विचार असं खोटं नरेटिव्ह सेट करतात. अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केली.

फेक नॅरेटीव्हवरून हल्लाबोल 
लोकसभेत आम्ही थोडेसे बेसावध राहिलो तर काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष महाविकास आघाडीने खोटं नॅरिटीव्ह सेट केलं. आरक्षण हटवणार, सोयाबीन कापूस, जातीय पद्धतीचा विचार असं हे नरटीव्ह आहे. आधी काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष पैसे देऊन निवडणुका जिंकायचे. निवडणुका जिंकण्यासाठी हे काहीही करू शकतात. आता त्यांनी जातीचा आधार घेतलाय. अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. 

मविआकडे कोणतेही नियोजन नाही 

आमचा जाहीरनामा, कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीने स्थिर सरकारसाठी लढायचं. आमचे त्यांचे दोन वर्ष आठ महिने आणि आमचा कार्यकाल याची तुलना करा. त्यांच्या काळात केंद्र सरकार मदत करत नाही एवढंच ते बोलत होते. महाविकास आघाडीच्या हातात हे राज्य गेलं तर ते वाट लावतील या राज्याची. त्यांच्याकडे कोणतही नियोजन नाही. माचिसचे डबे घेऊन कुठे आग लावता येईल एवढाच ते विचार करतात.  

बलात्काराविषयी यांच्या मनात प्रेम 
बदलापुरात जातील आणि म्हणतील बलात्काराला ताबडतोब फाशी द्या. आता त्या बलात्काऱ्याचं वकीलपत्र घेऊन कसं बोलतात. बलात्काराने दुष्ट बुद्धीनं पोलिसांवर हमला केल्यावर त्याच्याबद्दल यांच्या मनात किती प्रेम निर्माण झालंय. ते काय काय आक्षेप घेतायत हे समजून घेण्याची अपेक्षाय. असं मुनगंटीवार म्हणाले. 

 

 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार