मोठी बातमी : जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील दाम्पत्याने विष पित आत्महत्येचा केला प्रयत्न

लातूर जिल्ह्यात खळबळ; नेमका कसा घडला प्रकार, जाणून घ्या सविस्तर...!

On
मोठी बातमी : जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील दाम्पत्याने विष पित आत्महत्येचा केला प्रयत्न

लातूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात चांगलाच तापताना दिसतोय. लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे. अहमदपूरच्या ज्ञानोबा तिडोळे आणि पत्नी चंचला तिडोळे या दोघांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. या घटनेने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

काय घडला नेमका प्रकार? 

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सहा वेळा उपोषण केलंय. मात्र उपोषण करूनही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. तसेच मराठा आरक्षण दिले नाही. याच्या निराशेतून या पती-पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती आहे.  

तात्काळ रुग्णालयात नेल्याने जीव वाचला

अहमदपूर मधील राहणाऱ्या या जोडप्यानं मराठा आरक्षणासाठी विष पीत आत्महत्येचा प्रयत्न केलाय.  दरम्यान, वेळीच त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचा सांगण्यात येत आहे.

मराठवाड्यात यापूर्वीही बार्शीतल्या तरुणाचं सुसाईड नोट देऊन मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवल्याची घटना घडली होती. आता लातूरच्या अहमदपूरमधील जोडप्यानं विष पीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मराठा आरक्षणाचं उपोषण स्थगित

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी नवव्या दिवशी त्यांचं उपोषण थांबवलं आहे. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण स्थगित करावं अशी मागणी अंतरवाली सराटीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी केली होती. त्यानंतर आत मनोज जरांगे यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं. अंतरवालीमध्ये जमलेल्या महिला आणि बांधवांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगेंनी हे आंदोलन स्थगित केलं. मनोज जरांगे यांच्यावर आता छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे त्यांच्या अंतरवाली सराटीत आंदोलनासाठी बसले होते. पण या काळात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारने कोणतंही पाऊल उचललं नसल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जरांगेंच्या विरोधात आंदोलन सुरू केलं.  

वसमत तालुक्यातील युवकाने केली होती आत्महत्या 

वसमत तालुक्यातील तेलगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तसेच नापीकीमुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 9 अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. रामेश्‍वर पंडीतराव कानोडे (22) असे तरुणाचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलगाव येथील रामेश्‍वर यांना त्यांच्या वडिलांच्या नावे चार एकर शेती आहे. या शेतीवर त्यांनी एका खाजगी बँकेचे 4 लाख रुपये व एका राष्ट्रीयकृत बँकेचे 2.50 लाख रुपये कर्ज घेतले होते. मागील काही वर्षात सतत होणाऱ्या नापीकीमुळे कर्ज कसे फेडावे असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा राहिला होता. त्यात सरकार मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार