केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याच्या दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार

दोन दिवस मेगा बैठका; त्यानंतर निवडणुकीचा बिगुल वाजणार, 'या' दोन तारखा महत्त्वाच्या 

On
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याच्या दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार

Central Election Commission Maharashtra tour : केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. हे पथक राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेणार आहे. या बैठकीमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असून, त्याला या बैठकीनंतर हिरवा कंदील मिळेल असा दावा केला जात आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लवकर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग पुढील महिन्यात केव्हाही निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागलेत. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखांची वाट पाहणाऱ्या सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने आपले कान टवकारलेत.

27 तारखेपासून सलग 2 दिवस बैठक

यासंबंधीच्या वृत्तानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 27 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन सलग दोन दिवस राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. या बैठकीत राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेऊन हे पथक संबंधितांना योग्य ते दिशानिर्देश व सूचना करेल असा अंदाज आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः राज्यातील सणवार व इतर महत्त्वाचे दिवस पाहून या बैठकीत निवडणुकीची तारीख ठरवली जाईल असे सांगितले जात आहे.

यंदाची निवडणूक फारच रंजकदार

उल्लेखनीय बाब म्हणजे 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. गत काही वर्षांत राज्याचे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 2 महत्त्वाच्या पक्षांत फूट अनुभवली आहे. सध्या या दोन्ही पक्षांचे 2 स्वतंत्र गट निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यातच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचेही प्रयत्न सुरू असल्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंजकदार होणार आहे.

वंचितची उमेदवार जाहीर करण्यात आघाडी

दुसरीकडे, महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप जाहीर झाले नाही. या दोन्ही आघाड्यांत काही जागांवरून अद्याप मतभेद आहेत. त्यामुळे त्यांच्या जागावाटपाला अजून काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. पण वंचित बहुजन आघाडीने शनिवारी आपल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. वंचितने आपल्या मित्र पक्षांच्या इतर 2 उमेदवारांच्याही नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्यात या महत्त्वाच्या पक्षाने सर्वच इतर पक्षांवर आघाडी घेतली आहे.  

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार