हर्षवर्धन पाटील हाती 'तुतारी' घेणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल

व्हायरल झालेल्या फोटोवर हर्षवर्धन पाटील म्हणाले- मी अजून कोणताही निर्णय घेतला नाही

On
हर्षवर्धन पाटील हाती 'तुतारी' घेणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडतानाचे चित्र आहे. अशातच जागावाटपानंतर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा सुरू आहे. अशातच भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहेत. 

'त्या' चर्चांवर हर्षवर्धन पाटील यांनी वारंवार स्पष्टीकरण देखील दिले आहे. मात्र आज पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारण म्हणजे सोशल मिडियावरती हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

या व्हायरल झालेल्या या फोटोवरती 'नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी' असं लिहण्यात आलं आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हर्षवर्धन पाटील येणार अशा पद्धतीची सध्या सोशल मीडियात पोस्टर व्हायरल होत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून असं काही नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे. 

व्हायरल झालेल्या फोटोवर हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया

हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चेवर पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिणीशी बोलताना  हर्षवर्धन पाटील म्हणाले, 'याआधी देखील असे बॅनर व्हायरल झाले आहेत. परंतु आम्हीच आतापर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागांचे वाटप झालेलं नाही.

आम्ही वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडं लक्ष ठेवून आहोत असे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. पितृ पक्ष पंधरवडा झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत जाणून घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचे हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी सांगितले आहे. 

हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी....

याआधी इंदापूरमध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे बॅनर झळकले आहेत. त्यावर इंदापूर तालुक्याची झाली तयारी हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, असं लिहण्यात आलं होतं. इंदापूरच्या आठवडे बाजाराच्या दिवशी भर चौकात एक फ्लेक्स लागला होता. त्यावर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे फोटो होते. तर मजकूर अचंबित करत होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार