महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी लागणार, पोलिंग स्टेशन किती असतील, काय म्हणाले EC, वाचा सविस्तर

दिवाळीसह सण उत्सवाचा विचार करून निर्णय घेतला जाईल - राजीव कुमार; पक्षाच्या नेत्यांशी साधला संवाद

On
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी लागणार, पोलिंग स्टेशन किती असतील, काय म्हणाले EC, वाचा सविस्तर

Election Commission PC : केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांसाठीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्त्वाचीच माहिती दिली. निवडणुकाच्या तारखा प्रामुख्याने सण उत्सवाच्या नंतर जाहीर केल्या जाव्यात, अशी विनंती राज्यातील सर्व पक्षांनी केल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली. 

सणवार लक्षात घेऊन मतदानाची तारीख ठरवणार

राजीव कुमार म्हणाले, आम्ही दोन दिवस विविध राजकीय पक्षांसह सर्वच भागिदारांशी चर्चा केली. त्यात सर्वच पक्षांनी दीपावली, देव दिवाळी व छटपूजेसारखे सणवार लक्षात घेऊन निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती केली.

राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख आठवड्याच्या मध्यभागी ठेवण्याचीही सूचना केली. त्यांची ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, निवडणुकीची तारीख आठवड्याच्या शेवटी ठेवल्यामुळे शहरी भागातील मतदार सुट्ट्यांचा मेळ साधून शहराबाहेर जातात. त्याचा फटका निवडणुकीच्या टक्केवारीला बसतो. त्यामुळे मतदानाची तारीख आठवड्याच्या मध्यभागी ठेवली जावी अशी त्यांची विनंती होती, असे राजीव कुमार म्हणाले. 

राजीव कुमार म्हणाले की, राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी माहिती दिली. तसेच, निवडणूक काळात काही निर्बंध घालण्यात येणार असून एटीएमसाठी पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचे बंधन असणार आहे. तसेच, याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल, असेही ते म्हणाले.  

मतदारसंघ, मतदारांची एकूण संख्या किती 

राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत. 

पोलिंग स्टेशन 1 लाख 186 असणार 
शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या 42 हजार 585, तर ग्रामीण महाराष्ट्रात 57 हजार 601 मतदान बुथ केंद्र असणार आहेत. काही ठिकाणीं तरूण अधिकारी बूथ मँनेज करतील. 350 असे बूथ असतील जिथे तरुण अधिकारी बूथ मॅनेज करतील.

या अॅपवर तक्रार करता येणार
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

निवडणूक काळात एटीएम व्हॅनला निर्बंध
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात रात्री 6 ते सकाळीं 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणारं नाही. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवलं जाईल.  

लोकसभेला इथं मतदान कमी
लोकसभा निवडणुकीत कमी मतदान क्षेत्र असेलल्या कुलाबा, कल्याण, कुर्ला, मुंबादेवी इथ मतदान कमी झालं आहे.  गडचिरोली येथे 73 टक्के मतदान झालं, मग कुलाबा कल्याण येथे मतदानाचा टक्का वाढायला हवा. इथल्या मतदारांनी विचार करायला हवा,असेही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. 

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार