बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर 11 जणांकडून बलात्कार

आधी चार नंतर सात आरोपींना केली अटक, नराधमांनी मुलींना पाजली होती दारू

On
बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर 11 जणांकडून बलात्कार

Pune Crime Latest News : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात 14 सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्या आरोपींकडे अधिकचा तपास केल्यावर आणखी 7 जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

या आरोपींना झाली अटक

ज्ञानेश्वर भारत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती), यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती), जय ऊर्फ जयेश अशोक मोरे (रा. तांदूळवाडी, बारामती) या चार आरोपींना सुरुवातीलाच अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ओंकार भारती, ओम कांबळे, आप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे आणि श्रेणिक भंडारी या सात जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील नववीत शिक्षण घेणार्‍या दोन अल्पवयीन मुली १४ सप्टेंबर रोजी घरामध्ये कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. त्या दोघी हडपसर या ठिकाणी आल्यावर, आरोपी ज्ञानेश्वर आटोळे यांच्याशी पीडित मुलींनी संपर्क साधला.

त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर आटोळे याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना सांगितले की, रूमवर दोन मुली आल्या आहेत. त्यानंतर त्याचे तीन मित्र रुमवर आले आणि त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना दारु पाजून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलींनी त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला.  

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार