संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा; भरत गोगावलेंचा निशाणा

म्हणाले- एकनाथ शिंदेंबाबत बोलणे चुकीचे, ते बोलतात तसे करायला संजय राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील 

On
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा; भरत गोगावलेंचा निशाणा

Badlapur Case, Bharat Gogawale on Sanjay Raut :   बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे  याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला.

या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. तर यावरून संजय राऊत  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय, दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल, असे त्यांनी म्हटले होते. या टीकेवरून आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार  भरत गोगवले यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

तर संजय राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील 

संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे, अशा खरमरीत शब्दात भरत गोगावले यांनी टीका केली आहे. अक्षय शिंदेने केलेल्या पापाचे कृत्य जर भारताबाहेरच्या कुठल्या देशात असतं, तर त्याला तिथल्या तिथेच गोळ्या घालून ठार केल असतं. मात्र आपला देश संविधानवर चालतो.

आपल्या देशात मजबूत कायदा सुव्यवस्था आहे. त्यामुळे कायद्यानुसारच ती शिक्षा झाली असती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गरिबांचे मसीहा आहेत. त्यामुळे राज्यातील जनता त्यांना पुन्हा सत्तेत बसवत मुख्यमंत्री करेल. त्यामुळे संजय राऊतांच्या पोटात दुखायला लागले आहे. त्यातूनच ते मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एन्काऊंटर करायला संजय राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील, असे म्हणत  आमदार भरत गोगावले यांनी पलटवार केला आहे.  

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?

राज्यात आणि देशात असे अनेक एन्काऊंटर आम्ही पाहिले आहे. मला जितकी अंडरवर्ल्डची माहिती आहे तेवढं गृहमंत्री आणि एन्काऊंटर करणाऱ्यांना देखील माहिती नाही. संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्कोअंतर्गत का गुन्हा दाखल केला आरोपीने आपल्या जबावात काही खुलासे केले होते म्हणून त्याचं एन्काऊंटर झालं. कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला. एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय. दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.  

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार