'तुझा मोबाईल नंबर दे', अल्पवयीन मुलीची काढली छेड, गंजगोलाई परिसरातील कॅफेमधील घटना

तीन जणांवर पोक्सो, अट्रॉसिटीचा गुन्हा: ‘ मोबाईल नंबर दे ’ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

On
'तुझा मोबाईल नंबर दे', अल्पवयीन मुलीची काढली छेड, गंजगोलाई परिसरातील कॅफेमधील घटना

लातूर / प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला बोलावून छेड काढत विनयभंग केल्याची घटना गंजगोलाई मध्ये घडली आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी ३ जणांविरुद्ध गुरनं ६२७/२४ कलम ७५(१) २,४९, बीएनएस, ३(१) पोक्सो, अ‌ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवार (दि.२७) रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. वाढदिवसासाठी पीडित अल्पवयीन मुलीला गंजगोलाई परिसरातील एका कॅफेमध्ये बोलावून घेतले होते. यावेळी कॅफेमध्ये असलेल्या तिघांमधील एकाने पीडित अल्पवयीन मुलीला तुझा मोबाईल नंबर माझ्या मोबाईलमध्ये डायल कर असा आग्रह केला, तर दोघांनी त्याला प्रोत्साहान दिले. पिडीत मुलीने विरोध केला असता एकाने बळजबरी केली. आफताब शेख, शाहीद शेख, जमीर शेख (तिघे रा. लातूर) अशी आरोपीची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलीने याबाबत फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी गांधी चौक पोलिसांकडून गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपीना अटक करण्यात आली. या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे करत आहेत.

जिल्हाभरात छेडछाडी चे प्रमाण वाढले...

मागील महिण्यात गुरुवार (दि.२९) रोजी २४ वर्षीय तरुणी सकाळी गूळ मार्केट येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेली असता भाजी विक्रेत्या आरोपीने छेड काढल्याची घटना घडली होती त्यानंतर आता एक महिन्याच्या आतच विनयभंगाची दुसरी घटना घडल्याने नराधमांवर कायद्याचा जरब कमी झाल्याची उलटसुलट चर्चा नागरिकांतून होत आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार