मुख्यमंत्री होण्याची माझी प्रचंड इच्छा, पण गाडी DCMच्या पुढे सरकतच नाही - अजित पवार

म्हणाले- महायुती म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार, पुन्हा आमचीच सत्ता येणार

On
मुख्यमंत्री होण्याची माझी प्रचंड इच्छा, पण गाडी DCMच्या पुढे सरकतच नाही - अजित पवार

DCM Ajit Pawar on CM post : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण माझी गाडी उपमुख्यमंत्रीपदाहून पुढे सरकतच नाही, मग मी काय करू, असे ते बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणालेत. या विधानामुळे पुन्हा अजित पवारांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहत आहेत. सध्या सत्ताधारी महायुती व विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी उपरोक्त विधान केले आहे. ते बुधवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना म्हणाले की, माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे.

पण माझी गाडी उपमुख्यमंत्री पदावरच जावून थांबते. मी काय करू? महायुती सरकारमध्ये जाताना मी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली होती. यात जे पी नड्डा, अमित शहा, नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता. आता इतर लोक काय म्हणत आहेत, त्याचे मला काहीही देणेघेणे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक महायुतीचा घटकपक्ष म्हणूनच लढवेल.

कोण किती जागा लढवणार? हे लवकरच समजेल

अजित पवारांनी यावेळी महायुतीमधील जागावाटपाच्या मुद्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, जागावाटपाच्या मुद्यावर भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतली. कालच आम्ही अमित शहांशी चर्चा केली. त्यामुळे भाजप किती जागांवर लढणार, आम्ही किती जागा लढणार व एकनाथ शिंदेंचा पक्ष किता जागा लढवणार याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल. आमची महायुती तुटणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा घटकपक्ष म्हणूनच लढेल. आमचा प्रयत्न राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याचा आहे.

भूतकाळाचा विचार करणे सोडून दिले

शरद पवारांविरोधात जाण्याच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, जे काही घडले त्यावर विचार करणे मी सोडले आहे. आम्ही आता भविष्याचा विचार करत आहोत. भूतकाळ आम्ही मागे सोडला. आम्ही भविष्य सांगणारे नाही, तर काम करणारे लोक आहोत. आमची महाराष्ट्राला पुढे नेण्याची इच्छा आहे. महाराष्ट्रात जी काही विकासकामे होत आहेत, त्यासाठी केंद्रातून निधी आणण्याचे काम आम्हाला करायचे आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपानंतर आमदार होण्याची इच्छा असणारे अनेकजण इकडून तिकडे जातील व तिकडून इकडे येतील.

'मला मुख्यमंत्री व्हायचंय पण...'

नितीशकुमार यांच्याप्रमाणे तुमच्या नावावर उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम आहे. मुख्यमंत्री व्हावे असे कधी वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, व्हायचे आहे. पण माझी गाडी तिथेच अडकते. काय करू. गाडी पुढे नेण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. पण संधीच मिळत नाही. एकदा राष्ट्रवादीला 2004 मध्ये संधी मिळाली होती. पण पक्ष नेतृत्वाने ती गमावली. जो कुणी खुर्चीवर बसतो, त्याला ती खुर्ची चांगली वाटते. त्याच हिशोबाने प्रयत्न करण्याचे प्रत्येकाचे काम असते. पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची एकच आहे. जो 145 जागांचा जादुई आकडा गाठेल, तो त्या खुर्चीवर बसेल. माझी महत्त्वकांक्षा काय आहे हे मी आताच सांगणार नाही. तूर्त आमचे लक्ष महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचे आहे.

पवारांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही

शरद पवार यांच्या भेटीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी गतवर्षी जुलैमध्ये सरकारमध्ये सहभागी झालो. त्यानंतर दिवाळी आली, त्याच काळात आमची भेट झाली. आम्ही एकजुटीने दिवाळी साजरी केली. घरात कोणतेही राजकारण नाही. घरात आम्ही एकमेकांना जेवण देतो. ते (शरद पवार) माझे मोठे काका आहेत. मी त्यांना काय सांगू? मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहूही शकत नाही.  

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार