मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली:पुण्याहून विशेष विमानाने मुंबईत आणले, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

On
मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली:पुण्याहून विशेष विमानाने मुंबईत आणले, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडली आहे. यामुळे त्यांना तातडीने विशेष विमानाने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

छगन भुजबळ पुण्यात असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली. यावेळी पुण्याहून विशेष विमानाची सोय करत त्यांना थेट बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

छगन भुजबळ यांना नेमका कशाचा त्रास झाला व कशामुळे त्यांची अचानक प्रकृती बिघडली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू होते तसेच आगामी विधानसभा निवडणुकीचे देखील वातावरण असल्याने सर्वच पक्ष व प्रमुख नेते मोर्चेबांधणी करत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील प्रमुख नेत्यांचे राज्यभर दौरे देखील सुरू आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा देखील राज्यभर सुरू आहे. यात पक्षाच्या प्रमुख नेत्यांना उपस्थित राहावे लागते. यात सातत्याने होणारा प्रवास व दगदग यामुळे देखील प्रकृती खराब होऊ शकते. छगन भुजबळ यांचे देखील राज्यभर दौरे सुरू होते. अनेक ठिकाणी ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू होते त्यासाठी देखील त्यांना भेटी द्याव्या लागत होत्या. यामुळे कदाचित त्यांना थकवा आला असू शकतो. मात्र छगन भुजबळ यांना नेमका काय त्रास होतोय याची माहिती समोर येऊ शकली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्येही अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी छगन भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शन झाले होते.

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार