पुणे विमानतळाच्या नामकरणाला राज्याची मंजुरी, 'जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ' असे ठेवले नाव 

On
पुणे विमानतळाच्या नामकरणाला राज्याची मंजुरी, 'जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ' असे ठेवले नाव 

Pune airport to be rename Jagadguru Sant Tukaram Maharaj Airport : पुणे विमानतळाचे ' जगतगुरू संत तुकाराम महाराज विमानतळ' असे नामकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने सोमवारी अधिकृत मान्यता दिली.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमात याबद्दल माहिती दिली होती. तर आजच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

कोण आहेत संत तुकाराम महाराज?

संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत - कवी होते. त्यांचा जन्म देहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरू' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - 'पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. 'जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!' अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव पुणे विमानतळाला देण्यात यावे, अशा मागणीचा प्रस्ताव पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीसरकारला दिला होता, तो आम्ही स्वीकारला आहे. येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज ते पुण्यात पालखी मार्ग भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते. त्यानंतर दुपारून मंत्रिमंडळाची बैठक झाली, यात या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार